मुंबई : आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पहिल्या चार महिन्यांत के्रडिट कार्ड आणि पर्सनल लोन या माध्यमातून दिले जाणारे कर्जाचे प्रमाण वाढले आहे, तर बँकांच्या माध्यमातून दिल्या जाणाºया सेवा (कर्ज व इतर) कमी झाल्याचे दिसून येत आहे. १८ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसते की, बँकांकडून दिले जाणारे कर्ज १.३७ लाख कोटींवरुन ७७.०४ लाख कोटी रुपये झाले आहे. एकूणच के्रडिट कार्डचे व्यवहार वाढले आहेत, तर बँकांच्या माध्यमातून होणाºया कर्ज वितरणात घट झाली आहे.
सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये झालेले विलीनीकरण आणि रिअल इस्टेट क्षेत्रात झालेली घसरण, यामुळे गृहकर्जात घट झाल्याचे दिसून येत आहे. याच काळात बँकांनी आपल्या शाखांच्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित केल्याने किरकोळ स्वरूपातील कर्जातही घट झाली आहे. या काळात बँकांच्या एकूणच कर्ज वितरणात १.९५ लाख कोटींची घट झाली आहे. बिगर बँकिंग आर्थिक संस्थांच्या व्यवहारातही घट झाल्याचे दिसून येत आहे. वित्त कंपन्यांना देण्यात येणाºया कर्जातही ५३,५०० कोटींची घट होऊन हे कर्ज ३,३७,५०० कोटी झाले आहे. याचे कारण असेही असू शकते की, याच काळात छोट्या वित्तसंस्था लहान बँकांमध्ये रूपांतरित झाल्या.
एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्या कांती घोष यांच्या मते, अनेक जण आपल्या संपत्तीच्या आधारावर (विमा, पीपीएफ, पेन्शन आदी.) कर्ज घेत आहेत.
तथापि, उद्योग क्षेत्रात लोखंड व स्टील क्षेत्राला पतपुरवठा केला गेला आहे. इतर क्षेत्रातील पतपुरवठा कमी झाला असला, तरी स्टील क्षेत्रातील आर्थिक ताण आता कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
होम लोनमध्ये घट, पहिल्या चार महिन्यांत क्रेडिट कार्डचे व्यवहार वाढले
आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये पहिल्या चार महिन्यांत के्रडिट कार्ड आणि पर्सनल लोन या माध्यमातून दिले जाणारे कर्जाचे प्रमाण वाढले आहे, तर बँकांच्या माध्यमातून दिल्या जाणा-या सेवा (कर्ज व इतर) कमी झाल्याचे दिसून येत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:31 AM2017-09-04T01:31:44+5:302017-09-04T01:33:14+5:30