Lokmat Money > बिझनेस न्यूज > मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट

मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट

आंतरराष्ट्रीय बँक ‘एचएसबीसी’ने जारी केलेला ‘कंपोजिट पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) ऑगस्टमध्ये घटून ६०.५ अंकांवर आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:50 AM2024-08-24T05:50:18+5:302024-08-24T05:55:01+5:30

आंतरराष्ट्रीय बँक ‘एचएसबीसी’ने जारी केलेला ‘कंपोजिट पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) ऑगस्टमध्ये घटून ६०.५ अंकांवर आला.

Decrease in demand, new orders will come, decrease in production due to decrease in private sector expansion | मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट

मागणी कमी, नव्या ऑर्डर्स येईनात; निर्मिती कमी झाल्याने खासगी क्षेत्राच्या विस्तारात घट

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात वस्तू उत्पादन क्षेत्रातील वृद्धी नरम राहिली. नवीन ऑर्डर्समधील वृद्धी कमजोर पडल्यामुळे खाजगी क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार सुस्त राहिला.

आंतरराष्ट्रीय बँक ‘एचएसबीसी’ने जारी केलेला ‘कंपोजिट पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) ऑगस्टमध्ये घटून ६०.५ अंकांवर आला. जुलैमध्ये तो ६०.७ अंक इतका होता. वास्तविक भारताच्या वस्तू उत्पादन व सेवा क्षेत्रातील संयुक्त उत्पादनातील मासिक बदलाचे मोजमाप करणारा हा निर्देशांक सलग ३७ व्या महिन्यात वृद्धी दर्शवित आहे.

सर्वेक्षणात म्हटले आहे की, ‘आकड्यांतून व्यवसायातील तेज वृद्धी, ठोस रोजगार निर्मिती आणि विकासाच्या शक्यतांच्या बाबतीत आशावादी दृष्टिकोन याचे संकेत मिळतात. उत्पादन खर्च आणि विक्री मूल्य या दोन्हींतील वृद्धी सुस्त असल्याचे आढळून आले. वस्तू उत्पादन क्षेत्रातील वृद्धी कमजोर राहिली. सेवा क्षेत्रातील वृद्धी थोडी मजबूत असल्याचे दिसून आले, असे या अहवालात म्हटले आहे. 

उत्पादन वाढीवर परिणाम 
‘एचएसबीसी’तील मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, भारताचा फ्लॅश कंपोजिट पीएमआय ऑगस्टमध्ये थोडा खाली आला. ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत मात्र तो बराच वर आहे. वस्तू उत्पादनाच्या वृद्धीत सुस्ती आहे. 
सेवा संस्थांच्या व्यवसायात तेज वृद्धी आढळली. नव्या ऑर्डर्सची वृद्धी घटून फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर गेली. विस्ताराची गती मात्र तेज आहे. यावरून मजबूत मागणी आणि बाजारातील अनुकूल स्थिती कायम आहे, असे दिसते.

Web Title: Decrease in demand, new orders will come, decrease in production due to decrease in private sector expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.