Join us

रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट

By admin | Published: August 06, 2015 10:28 PM

अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे या वर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ४ ते ५ टक्के घट झाली आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

चंदीगड : अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे या वर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ४ ते ५ टक्के घट झाली आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.अनारक्षित श्रेणीच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तथापि, आरक्षण श्रेणीतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. पायाभूत सुविधा आणि रस्ते वाहतूक सुधारल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. शताब्दी किंवा एक्स्प्रेसच्या प्रवाशांची संख्या कायम आहे. कारण या लांब पल्ल्याच्या ट्रेन आहेत, असे उत्तर रेल्वेचे सहायक सरव्यवस्थापक एस. के. अग्रवाल यांनी सांगितले.शताब्दी लोकप्रिय आहे. शताब्दीचे प्रवासी कमी होणार नाहीत. १०० ते १२५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ट्रेनच्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.