Join us

विविध चिंतांमुळे शेअर बाजारात घट

By admin | Published: May 23, 2016 5:08 AM

बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबीने कडक केलेले पी नोट बाबतचे नियम, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना झालेला मोठा तोटा, अमेरिकेत होऊ घातलेली व्याजदरवाढ तसेच रुपयाची घसरती

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीबाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबीने कडक केलेले पी नोट बाबतचे नियम, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना झालेला मोठा तोटा, अमेरिकेत होऊ घातलेली व्याजदरवाढ तसेच रुपयाची घसरती किंमत अशा विविध चिंता वाटणाऱ्या बाबींमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहात घसरला. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालांमुळेही बाजारावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून आला नाही.गतसप्ताहाच्या प्रारंभीच पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमुळे जीएसटी विधेयकाला गती मिळण्याची शक्यता निर्माण होऊनही बाजाराने त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून आले. सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक१८७.६७ अंशांनी खाली येऊन २५३०१.९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६५.२० अंश म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटून ७७४९.७० अंशांवर बंद झाला. या निर्देशांकातील केवळ १६ आस्थापनांचे दर वाढीव पातळीवर बंद झालेले दिसून आले.करचुकवेगिरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पी नोटस्द्वारे निर्बंध आणल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यामुळे बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. याच जोडीला भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना मोठा तोटा झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. यामुळेही बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आला आणि निर्देशांक घसरले.आगामी काळामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील चलनवाढ तसेच रोजगाराची स्थिती बघून ही वाढ केली जाऊ शकते, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, सध्या अमेरिकेतील चलनवाढ काबूमध्ये असल्याने जूनपासून अमेरिकेतील व्याजदरामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेही बाजारावर काही प्रमाणात विक्रीचा दबाव आलेला दिसून आला. परिणामी, बाजार खालीच आला.