नवी दिल्ली : महागाईत अर्धा टक्क्यांची घट झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१८ मध्ये देशातील महागाईचा दर ४.४४ टक्के राहिला आहे. हा दर जानेवारी महिन्यात ५.०७ टक्के होता. तर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ३.६५ टक्के होता. फेब्रुवारीत ग्रामीण भागातील महागाई ५.२१ वरुन ४.३७ व शहरी भागातील महागाई ४.९३ वरुन ४.५२ टक्क्यांवर आला आहे. दोन्ही भागातील खाद्यान्नांच्या दरात दिड ते दोन टक्का घट झाली. प्रामुख्याने भाज्यांच्या किमतीत झालेली ६ टक्क्यांची घट आणि इंधनाच्या स्थिर राहिलेल्या किमती, यामुळे महागाई दरात घट झाल्याचे दिसून आले आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ
नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात हा निर्देशांक ७.५ टक्के राहिल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात नमूद आहे. हा दर डिसेंबर महिन्यात अवघा ४.२ तर नोव्हेंबर महिन्यात ६.८ टक्के होता. जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राने ८.७ टक्क्यांचा दमदार विकास केला. यासोबतच वीजनिर्मिती क्षेत्रही ७.६ टक्के दराने वाढले. त्याचा परिणाम होऊन औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ झाली.
महागाईत अर्धा टक्का घट; औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ
महागाईत अर्धा टक्क्यांची घट झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१८ मध्ये देशातील महागाईचा दर ४.४४ टक्के राहिला आहे. हा दर जानेवारी महिन्यात ५.०७ टक्के होता. तर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ३.६५ टक्के होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 07:23 PM2018-03-12T19:23:53+5:302018-03-12T19:23:53+5:30