Lokmat Money > बिझनेस न्यूज > या शेअरनं दाखवली कमाल! 1 लाखाचे झाले 9 कोटी, 2 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला स्टॉक

या शेअरनं दाखवली कमाल! 1 लाखाचे झाले 9 कोटी, 2 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला स्टॉक

या शेअरने गेल्या 5 वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:41 PM2022-06-09T18:41:20+5:302022-06-09T19:02:04+5:30

या शेअरने गेल्या 5 वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे...

deepak nitrite shares moved from 2 rupee to 1750 rupee 1 lakh became 9 crore | या शेअरनं दाखवली कमाल! 1 लाखाचे झाले 9 कोटी, 2 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला स्टॉक

या शेअरनं दाखवली कमाल! 1 लाखाचे झाले 9 कोटी, 2 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला स्टॉक

केमिकल इंडस्ट्रीशी संबंधित कंपनीच्या शेअरने आतापर्यंत 800% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कंपनीचे नाव दीपक नायट्रेट (Deepak Nitrite) असे आहे. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर, यावर्षात आतापर्यंत, कंपनीच्या शेअर्समध्ये 30% हून अधिकची घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 3020 रुपये एवढा आहे.

1 लाखाचे झाले 9 कोटी रुपये -
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) दीपक नायट्रेटचा शेअर 10 ऑगस्ट 2001 रोजी 1.96 रुपयांवर होता. तो 9 जून 2022 रोजी 1767.65 रुपयांवर व्यवहार करत आहे. या काळात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 80,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 

जर एखाद्या व्यक्तीने 10 ऑगस्ट 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता त्याचे 9 कोटी रुपये झाले असते. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1712.50 रुपये आहे.ॉ

10 वर्षांतच 1 लाख रुपयांचे झाले 1 कोटी रुपये - 
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) दीपक नाइट्राइटचा शेअर 8 जून 2012 रोजी 16.15 रुपयांवर होते. तो 9 जून 2022 रोजी BSE वर रु. 1767.65 रुपयांवर पोहोचला आहे. एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज त्याचे 1.09 कोटी रुपये झाले असते.

मात्र, या कंपनीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत जवळपास 24 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच गेल्या एका महिन्यात सुमारे 12 टक्क्यांनी घसरले आहेत.

Web Title: deepak nitrite shares moved from 2 rupee to 1750 rupee 1 lakh became 9 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.