मुंबई : दिवाळीच्या मुहूर्ताच्या सौद्यांत गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९४.३९ अंकांनी घसरून ३२,३८९.९६ अंकांवर बंद झाला.
पारंपरिक संवत २०७४ या वर्षाचा शेअर बाजारातील पहिला दिवस गुरुवारी मुहूर्ताच्या सौद्यांनी सुरू झाला. या सौद्यांत सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी पहिल्याच सौद्यात नफा वसुलीचा प्रयत्न केल्यामुळे बाजारात घसरण झाली, असे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी झालेल्या एक तासाच्या व्यवहारात सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. मात्र, ही तेजी फार वेळ टिकली नाही. विक्रीचा जोर वाढल्यामुळे सेन्सेक्स १९४.३९ अंकांची घसरण दर्शवून बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४९.२९ अंकांनी घसरला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४.३० अंकांनी घसरून १०,१४६.५५ अंकावर बंद झाला. युरोपीय बाजारांतही कमजोर कल पाहायला मिळाला.
दरम्यान, संवत २०७३ हे वर्ष शेअर बाजारांसाठी लाभदायक राहिले. या वर्षात सेन्सेक्स ४,६४२.८४ अंकांनी अथवा १६.६१ टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे निफ्टी १,५७२.८५ अंकांनी अथवा १८.२० टक्क्यांनी वाढला.
मुहूर्ताच्या सौद्यात घसरण दर्शविणाºया क्षेत्रांत बँकिंग, मेटल, पीएसयू, इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, आॅइल अँड गॅस, आॅटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, रिअल्टी, एफएमसीजी आणि आयटी अशा बहुतांश सर्वच क्षेत्रांचा समावेश होता.
दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी घसरले
नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात दिवाळी मुहूर्ताच्या सौद्यांत गुरुवारी सोने २५० रुपयांनी घसरून ३०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदीही २०० रुपयांनी घसरून ४०,८०० रुपये किलो झाली. जागतिक बाजारात मात्र मौल्यवान धातू वाढले. लंडन येथील बाजारात सोने ०.४३ टक्क्यांनी वाढून १,२८६ डॉलर प्रतिऔंस झाले. त्याचप्रमाणे चांदी ०.१५ टक्क्यांनी वाढून १६.९९ डॉलर प्रतिऔंस झाली. दिल्लीत सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,७०० रुपये प्रतिनग असा स्थिर राहिला.
दीपावलीच्या मुहूर्ताला शेअर बाजारात घसरण
दिवाळीच्या मुहूर्ताच्या सौद्यांत गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९४.३९ अंकांनी घसरून ३२,३८९.९६ अंकांवर बंद झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:45 AM2017-10-20T00:45:42+5:302017-10-20T00:47:27+5:30