Join us  

तुम्हाला Deepfake Scam माहितीये? AI च्या फसवणूकीपासून वाचायचं असेल तर 'हे' जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 2:10 PM

तंत्रज्ञानाने जिथे एकीकडे तुमचे जीवन सोपं केलंय, तिकडेच या तंत्रज्ञानानं काही आव्हानंही निर्माण केली आहे.

AI Deepfake Fraud Scam: सध्या संपूर्ण जगात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ आहे. लोकांना त्यांचं सर्व काम AI चॅटबॉट्स आणि तंत्रज्ञानाच्य सहाय्यानं करायचंय. मात्र या तंत्रज्ञानाने जिथे एकीकडे तुमचे जीवन सोपं केलंय, तिकडेच या तंत्रज्ञानानं काही आव्हानंही निर्माण केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं, डिजिटल फसवणूक करणारे लोकांचा खिसा कापण्यासाठी डीपफेकचा वापर करत आहेत. अलीकडेच केरळमधील एका व्यक्तीची डीपफेक फ्रॉड करून 40,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. आता हे डीपफेक काय आहे, ते तुम्हाला कसं अडकवतं आणि तुम्ही ते कसे टाळू शकता, यासाठी सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.कसं होतंय स्कॅम?

  1. फसवणूक करणारे संबंधित व्यक्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती गोळा करतात. यामध्ये फोटो, व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग यांचा समावेश असतो. यामुळे त्याच्यासारखी वाटणारी डुप्लिकेट आयडेंटिटी तयार केली जाते.
  2. मग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं प्रोसेस करून आणि डीप लर्निंग टेक्निक वापरून मॉडेल तयार केले जातात. ते अगदी मिळतं जुळतं डीपफेक कंटेट तयार करतात.
  3. यानंतर, या मॉडेलवरून डीपफेक व्हिडीओ, ऑडिओ तयार केला जातो, ज्यामुळे एखाद्याची फसवणूक होऊ शकते. 

कसं ओळखाल स्कॅम ?

  • कॉलरचा आवाज थोडा बदललेला असेल.
  • कॉलर तुमच्याकडून तुमची वैयक्तिक आणि आवश्यक माहिती मागेल.
  • कॉलर पैशांसाठी मदत मागेल आणि त्याची वागणूक निराळी जाणवेल.
  • जर तुम्ही कॉल व्हेरिफाय  करण्यासाठी प्रश्न विचाराल तर तुम्हाला योग्य उत्तरही मिळणार नाही.  

कसा कराल बचाव? 

  • कोणतंही अनोळखी ट्रान्झॅक्शन करण्यापूप्वी त्याची पडताळणी करा.
  • कधीही आपली वैयक्तीक माहिती जसं की क्रेडिट कार्डाची माहिती, ओटीपी, सीवीवी शेअर करू नका.
  • सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट ठेवा आणि कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमचे फोटो व्हिडीओ पाहणार नाही याची खात्री करा.
  • डीपफेक टेक्नॉलॉजी आणि लेटेस्ट सायबर फ्रॉडबाबत सतर्क राहा.
  • सोशल मीडियावर कोणतीही माहिती फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी एकदा त्याची सत्यता पडताळून पाहा.
  • सायबर फ्रॉड झाल्यास त्याची www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करा. याशिवाय तुम्ही १९३० या क्रमांकावरही संपर्क साधू शकता.
टॅग्स :सायबर क्राइमआर्टिफिशिअल इंटेलिजन्स