RBI Deepfake Videos: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांचा बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असल्याचं दिसून आलंय. यानंतर बँकिंग क्षेत्राचे नियामक रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) आपल्या नागरिकांना सावध केलं. व्हायरल होत असलेल्या या फेक व्हिडिओमध्ये (Fake Video) आरबीआय गव्हर्नर आरबीआयच्या गुंतवणूक योजना सुरू करताना, तसंच त्यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलाय. आरबीआयनं हे व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलंय.
आरबीआयनं दिला इशारा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी, १९ नोव्हेंबर २०२४ रोजी एक निवेदन जारी करून रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्य व्हिडीओबद्दल इशारा दिला आहे. 'गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली आहे. या व्हिडीओमध्ये आरबीआय गव्हर्नर काही गुंतवणूक योजना सुरू करताना किंवा सपोर्ट करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना टेक्नॉनॉजिकल टूल्सच्या माध्यमातून या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे,' असं त्यात नमूद करण्यात आलंय.
RBI cautions public on deepfake videos of Top Management circulated over social media giving financial advicehttps://t.co/bH5yittrIu
— ReserveBankOfIndia (@RBI) November 19, 2024
आर्थिक सल्ला देत नाही
आरबीआयनं यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय. 'त्यांचे अधिकारी अशा कोणत्याही उपक्रमाचं समर्थन करत नाहीत किंवा त्यांचा सहभाग नाही,' असं म्हटलं. आरबीआयनं हे व्हिडीओ फेक असल्याचं सांगत असे कोणतेही आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत नसल्याचंही सांगितलंय. "सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा डीपफेक व्हिडीओवर विश्वास ठेवण्यापासून आणि त्यांना बळी पडण्यापासून नागरिकांना सावध केलं जातंय," असा इशाराही त्यांनी दिलाय.