Join us

मोठे बंगले नव्हे तर नव्या जमान्याचे सुपरस्टार्स छोटे फ्लॅट्स घेण्याला देतात पसंती, असं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 5:37 PM

या नव्या ट्रेंडमागे आहेत २ महत्त्वाची कारणं...

buying luxury flats instead of bungalow : भारतात मुंबईत घर असणं म्हणजे श्रीमंत असणे असं बरेचदा म्हटलं जातं. त्यामागे तसं खास कारणही आहे. कारण भारतातील बहुतांश अब्जाधीश हे मुंबईतच राहतात. देशातील रिअल इस्टेटच्या किमती येथे सर्वाधिक आहेत. त्यातच मुंबईचा दुसरा पैलू पाहिला तर मुंबई म्हणजे मायानगरी म्हणजेच कलाकारांची नगरी. देशातील बड्या सुपरस्टार्स या मुंबापुरीनीच आश्रय दिला. बड्या सेलिब्रिटीजने मुंबईत एकेकाळी बंगले घेणे पसंत केले होते, मात्र आता एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. बहुतेक सुपरस्टार्स बंगल्याऐवजी आलिशान फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. यामागची कारणं काय असतील? जाणून घेऊया.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून ते रेखा, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अजय देवगण, शाहरुख खान, यश चोप्रा यांचे कुटुंब आणि करण जोहर वगैरे सगळे मुंबईत मोठमोठ्या बंगल्यात राहतात. तर नव्या जमान्यातील सुपरस्टार दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विराट कोहली-अनुष्का शर्मा, कपिल शर्मा आणि कार्तिक आर्यन यांसारखे सेलिब्रिटी मात्र उच्चभ्रू सोसायटीत किंवा फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. हा विचारांमधला बदल कशामुळे असेल, याची जाणकारांकडून दोन कारणं सांगितलं जात आहेत.

पहिले कारण- मालमत्तेची वाढत जाणारी किंमत

मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँकच्या हाऊस अफोर्डेबिलिटी इंडेक्सनुसार, राहण्यासाठी मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर आहे. येथील मालमत्तेच्या किमती देशात सर्वाधिक आहेत. Anarock च्या अहवालानुसार, देशातील ३ सर्वात महाग निवासी परिसरांच्या यादीत वरळी, ताडदेव आणि महालक्ष्मी ही ३ ठिकाणे आहेत. याचा अर्थ एवढाच की मुंबईत जमिनीसह स्वतःचे घर घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. हा एक घटक आहे. त्यामुळे जॉन अब्राहमने लिकिंग रोडवर स्वत:चा तब्बल ७५ कोटींचा नवा बंगला कसा विकत घेतला, हा लोकांसमोर मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे.

दुसरे कारण- प्रत्येकाला सी-व्ह्यू ची भुरळ अन् सूर्यप्रकाश

मुंबईत नेहमी अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'प्रतीक्षा' किंवा 'जलसा' बंगल्याबद्दल तुम्ही खूप चर्चा ऐकल्या असतील. कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या 'पृथ्वी हाऊस' बद्दलही तुम्हाला माहिती असेल. पण हे सर्व बंगले समुद्र किनाऱ्यापासून दूर आहेत. मुंबईत राहणारे बहुतेक लोक सी व्ह्यू च्या प्रेमापोटी घरे खरेदी करू इच्छितात. शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत नवीन स्टार्स बंगल्याऐवजी लग्झरी सी-फेसिंग अपार्टमेंट्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मुंबईत उच्चभ्रू अपार्टमेंट घर खरेदी करण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे शहरातील उंच इमारतींचे बांधकाम. यामुळे लोक सूर्यप्रकाशाच्या शोधात उंच इमारतींमध्ये राहणे पसंत करतात. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, अँटिलियाला एवढ्या उंचीवर नेण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश मिळवणे हेच होते.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगव्यवसायदीपिका पादुकोणविराट कोहलीअनुष्का शर्मा