नवी दिल्ली : तुम्ही आता नवा एअरकंडिशनर विकत घेणार असाल, तर त्याच्या किमान तापमानाचे डिफॉल्ट सेटिंग २४ अंश सेल्सिअस इतकेच असेल. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने तसे एअरकंडिशनर बनविणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे. डिफॉल्ट सेटिंग २४ अंश सेल्सिअस असल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि तुमचेही विजेचे बिल कमी होईल. अर्थात, तुम्हाला तापमान आवश्यकतेनुसार कमी वा अधिक करता येईल. पण किमान तापमान ठरवून दिल्याप्रमाणे २४ अंश सेल्सिअस असणार आहे.
हे निर्देश ऊर्जा मंत्रालयाने ब्युरो आॅफ एनर्जी एफिशिअन्सीच्या शिफारशींच्या आधारे एसी कंपन्यांनी याआधीच दिले आहेत. त्यामुळे सर्व मानांकनांच्या (स्टार रेटिंग) एसीचे डिफॉल्ट सेटिंग ठरलेले असेल. अनेकदा काही जण तापमान खूपच खाली ठेवतात. त्यामुळे इतरांना थंडीचा त्रास होतो, काहींना त्यामुळे आजार होतात आणि निष्कारण विजेचा अपव्यय होतो आणि बिलही अधिक येते.
>शरीराचे तापमान ३७ अंश
पण बहुतांश लोक डिफॉल्ट सेटिंगमध्ये फार बदल करीत नाहीत, असे आढळून आले आहे. त्यामुळे २४ अंश सेल्सिअसपेक्षा खाली तापमानासाठी रिमोटचा वापर केला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. माणसाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. त्यामुळे उन्हाळ्यातही लोकांनी एसीचे तापमान २४पेक्षा कमी करू नये, अशी अपेक्षा असते.
यापुढे एसीचे डिफॉल्ट सेटिंग असणार २४ अंश सेल्सिअस; सर्व कंपन्यांना आदेश
तुम्ही आता नवा एअरकंडिशनर विकत घेणार असाल, तर त्याच्या किमान तापमानाचे डिफॉल्ट सेटिंग २४ अंश सेल्सिअस इतकेच असेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:05 AM2020-01-08T04:05:17+5:302020-01-08T04:06:37+5:30