Defence Stock: संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणाऱ्या 'झेन टेक्नॉलॉजी' (Zen Technologies Share Price) या स्मॉल कॅप कंपनीसाठी सध्या 'अच्छे दिन' आले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. याचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे. आज कंपनीचा शेअर रु. 807 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, याने गेल्या एका वर्षात 220% परतावा दिला आहे.
झेन टेक्नॉलॉजीज ऑर्डर डिटेल्स
गेल्या काही काळापासून कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळत आहेत. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, झेन टेक्नॉलॉजीला आता संरक्षण मंत्रालयाकडून 93 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. 27 जानेवारी रोजी कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. कंपनीने सांगितले की, 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांची एकूण ऑर्डर बुक सुमारे 1435 कोटी रुपये आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 129 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
कंपनीच्या शेअरचा इतिहास
झेन टेक्नॉलॉजी ही देशातील आघाडीची अँटी ड्रोन सिस्टीम मॅन्युफॅक्चरर आणि डिफेन्स सॉल्यूशन प्रोव्हायडर आहे. सध्या कंपनीचा शेअर 807 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यात 8 टक्के परतावा दिला आहे. तसेच, गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 220% आणि दोन वर्षांत 300 टक्क्यांहून अधिक परताव मिळाला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 912 रुपये आहे.
(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)