Defence Stocks Price : संरक्षणाची तयारी वाढवण्यासाठी संरक्षण खरेदी परिषदेने (डीएसी) २१,७७२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पाच अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स ४ डिसेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांपर्यंत वधारले. संरक्षण कंपन्यांमध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले. भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि भारत डायनॅमिक्स या कंपन्यांचे शेअर्स २-३ टक्क्यांनी वधारले. अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानं या संरक्षण कंपन्यांच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या गोष्टींना मंजुरी
डीएसीनं वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट्स (डब्ल्यूजेएफएसी), इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, रडार वॉर्निंग सिस्टम आणि अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर्ससह प्रस्तावांसाठी आवश्यक मान्यता (एओएन) दिली आहे.
त्यानंतर नौदल किनाऱ्याजवळ कमी तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्स, देखरेख, गस्त आणि शोध आणि बचाव (एसएआर) मोहिमा वाढविण्यासाठी ३१ नवीन डब्ल्यूजेएफएसी खरेदी करेल. यापूर्वी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सनं भारतीय नौदलाला डब्ल्यूजेएफएसीचा पुरवठा केला होता. त्यामुळे त्यासाठी पुन्हा ऑर्डर मिळण्याची कंपनीची अपेक्षा वाढली आहे.
विमानवाहू युद्धनौका, विध्वंसक आणि पाणबुड्या यांसारख्या उच्च मूल्याच्या तुकड्यांना संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले १२० फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट (एफआयसी-१) खरेदी करण्यास आणि टी-७२ आणि टी-९० रणगाडे आणि सुखोई लढाऊ विमानांच्या इंजिनांमध्ये फेरबदल करण्यास ही मान्यता देण्यात आली.
लवकरच एसयू-३० एमकेआयची ऑपरेशनल क्षमता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (ईडब्ल्यूएस) खरेदी देखील सुरू करण्यात येणार आहे. संरक्षण उपकरणं उत्पादक भारत इलेक्ट्रॉनिक्सनं भारतीय हवाई दलासाठी ईडब्ल्यूएस विकसित केले होते.
टार्गेट प्राईज किती?
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक अमित दीक्षित म्हणाले की, मंदीच्या काळानंतर देशांतर्गत ऑर्डरिंगमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह या दोन्ही कंपन्यांना अनुक्रमे ३५० रुपये आणि ९३५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'बाय' कॉल दिले आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)