Join us

‘मेक इन इंडिया’वर विलंबाचा परिणाम

By admin | Published: February 24, 2016 2:35 AM

गुंतवणुकीशी संबंधित प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाबाबत ‘असोचेम’ने तीव्र चिंता व्यक्त केली असून त्यामुळे पंतप्रधानांनी घोषित केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमावर

लखनौ : गुंतवणुकीशी संबंधित प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाबाबत ‘असोचेम’ने तीव्र चिंता व्यक्त केली असून त्यामुळे पंतप्रधानांनी घोषित केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमावर विपरीत परिणाम होत असल्याचेही म्हटले आहे.‘असोचेम’चे राष्ट्रीय महासचिव डी.एस. रावत यांनी येथे एका मुलाखतीत सांगितले की, भारत जगातील प्रमुख उत्पादन केंद्र व्हावे यासाठी भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पाची घोषणा केली; पण देशात येणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पाची अंमलबजावणी मंद आहे, त्यामुळे या प्रकल्पांपासून असलेली अपेक्षापूर्ती होत नाही. ते म्हणाले की, देशात गुंतवणूक करण्याची घोषणा होत आहे; पण प्रत्यक्षात गुंतवणूक होत नाही. त्यातही गुंतवणूक झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होत आहे. त्यामुळे सरकारने प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस रणनीती निश्चित केली पाहिजे. ‘असोचेम’च्या एका अहवालाचा हवाला रावत यांनी दिला.