Lokmat Money > बिझनेस न्यूज > याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 08:22 AM2022-10-26T08:22:36+5:302022-10-26T08:23:03+5:30

अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे.

Delays to these agents, increase in expenses by four and a half lakh crores; The common people are affected | याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

 नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या याेजनांना विलंब झाला असून परिणामी त्यांचा खर्च ४.५२ लाख काेटी रुपयांनी वाढला आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समाेर आली आहे.  विलंब झाल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे. त्यापैकी ३८४ याेजनांना विलंब झाला असून त्यांच्यावरील खर्च मूळ किमतीपेक्षा माेठ्या प्रमाणात वाढला आहे. 

यामुळे उशीर 
भूमि अधिग्रहण, वन व पर्यावरण विभागांची मंजुरी, काेराेना महामारी इत्यादी कारणांमुळे बहुतांश याेजनांना विलंब झाल्याचे अहवालात म्हटले. सरासरी ४२ महिन्याचा विलंब प्रत्येक याेजनेला हाेत आहे.

Web Title: Delays to these agents, increase in expenses by four and a half lakh crores; The common people are affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.