भारतपेचे (BharatPe) माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांना दिल्लीउच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. न्यायालयानं अश्नीर ग्रोव्हर यांना फिनटेक कंपनी भारतपे आणि एसबीआयचे चेअरमन यांच्या विरोधात केलेलं ट्विट ४८ तासांच्या आत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. अशनीर ग्रोव्हर यांनी भारत पे आणि एसबीआयचे चेअरमन यांचा उल्लेख "छोटे लोक" असा केला होता.
अशनीर ग्रोव्हर 'भारत पे'च्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकत नाहीत आणि एसबीआय चेअरमनवर त्यांनी केलेलं ट्विट टाळता येण्यासारखं होतं, असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय. हे ट्वीट आणखी काही नाही, पण भारत पे चे चेअरपर्सन, जे एसबीआयचे माजी चेअरमन आहेत, त्यांच्याप्रती एक संकेत होता, असंही न्यायालयानं नमूद केलंय.
काय म्हटलेलं अशनीर ग्रोव्हर यांनी?
नुकताच इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयविरोधात कठोर भूमिका घेतली होती. १२ मार्चे रोजी अशनीर ग्रोव्हर यांनी एक ट्विट केलं होतं. "एसबीआयचे चेअरमन छोटे लोक असतात. त्यांच्या विचारधारेत मोठी समस्या आहे. मी याचा अनुभव घेतला आहे आणि आता हे सर्वोच्च न्यायालयालाही समजलंय," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले होते.
रजनीश कुमार यांच्यासोबत वाद
२०२२ पासून एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार आणि अशनीर ग्रोव्हर यांच्यात वाद सुरू आहेत. "रजनीश कुमार यांची भारत पे मधील नियुक्ती ही सर्वात मोठी चूक होती," असं ट्वीट त्यंनी केलं होतं. रजनीश कुमार भारते पे च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमन होते. याशिवाय त्यांनी अशनीर ग्रोव्हर यांच्यावर डेटामध्ये हेराफेरीसह अनेक गंभीर आरोप केले होते.