Lokmat Money > बिझनेस न्यूज > CNG-PNG Prices Increased : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती

CNG-PNG Prices Increased : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती

आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:48 AM2021-10-13T09:48:55+5:302021-10-13T09:50:51+5:30

आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे.

Delhi CNG PNG prices gas price increased by indraprastha gas limited IGP | CNG-PNG Prices Increased : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती

CNG-PNG Prices Increased : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती

नवी दिल्ली - इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पुन्हा एकदा CNG आणि PNGच्या किंमतीत वाढ केली आहे. गॅसच्या किंमती वाढविण्याची 10 दिवसांतली ही दुसरी वेळ आहे. नव्या किंमती 13 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून लागू होतील. यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी किमती वाढविण्यात आल्या होत्या. याच बरोबर, या वर्षी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढण्याची ही 5 वी वेळ आहे. (CNG PNG price increased)

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनुसार, सीएनजी आणि पीएनजी दोन रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत आजपासून सीएनजी 49.76 रुपये प्रति किलो तर पीएनजी 35.11 रुपये प्रति एससीएमच्या दराने मिळेल.

याच बरोबर, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 56.02 रुपये प्रति किलो, तर गुरुग्राममध्ये 58.20 रुपये प्रति किलो मिळेल. पीएनजीच्या संदर्भात, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजीची प्रति एससीएम किंमत 34.86 रुपये आणि गुरुग्राममध्ये 33.31 रुपये एवढी असेल.

सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी -
गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या. त्यावेळी राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 42.70 रुपये प्रति किलो, तर पीएनजीची किंमत 27.50 रुपये प्रति एससीएम एवढी झाली होती. दिल्ली-एनसीआरमध्ये बहुतेक वाहने, बस, टॅक्सी आणि ऑटो सीएनजीवरच चालतात. आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे.

Web Title: Delhi CNG PNG prices gas price increased by indraprastha gas limited IGP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.