Join us  

शिक्षक ते मुख्यमंत्री.. अतिशी मार्लेना यांच्याकडे ना कार, ना दागिने; किती आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 1:11 PM

Atishi Marlena Net Worth : अतिशी मार्लेना आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहे. शिक्षक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या अतिशी यांची मालत्ता किती आहे?

Atishi Marlena Net Worth : राजधानी दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आधी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी बाहेर येताच आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांना धक्का दिला. अतिशी मार्लेना आता अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी म्हणून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. कालका जी येथील आमदार अतिशी मार्लेना यांचे खाजगी आणि राजकीय जीवन अतिशय उज्ज्वल राहिलं आहे. अतिशी मार्लेना यांनी दिल्ली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर शिक्षिका म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर सामाजिक संस्थेसोबत त्यांनी काम सुरू केलं. 2013 मध्ये नोकरीचा राजीनाम देत राजकीय मैदानात उडी घेतली. अतिशी यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात आम आदमी पार्टीमधून केली.

विशेष म्हणजे इतकी वर्षे काम करून राजकारणात आल्यानंतरही अतिशी मार्लेना यांच्याकडे केवळ 1 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती आहे. एडीआरच्या (Association for Democratic Reform) संलग्न साइट My Neta वर उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता जाहीर केली होती.

नॅशनल इलेक्शन वॉच साइटवर (https://www.myneta.info/delhi2020/candidate.php?candidate_id=8811) उपलब्ध माहितीनुसार, अतिशी मार्लेना यांच्याकडे फक्त 20,000 रुपये रोख आहेत, तर बँक आणि इतर आर्थिक ठेवी आहेत. फर्ममध्ये 1 कोटी 41 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे. मात्र, यामध्ये त्यांच्या पतीच्या उत्पन्नाचाही समावेश आहे.

बँकेत भरपूर पैसे, तरी घरी गाडी नाहीअतिशी मार्लेना यांच्या नावावर ३९ लाख रुपयांच्या दोन बँक एफडी आहेत. त्यांनी त्यांच्या नावावर 5 लाखांहून अधिक रुपयांची विमा पॉलिसी घेतली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे अतिशी मार्लेना यांच्याकडे कोणतीही कार, दागिने किंवा इतर कोणतीही मालमत्ता नाही. त्यांनी कोणत्याही बँकेकडून कर्जही घेतलेले नाही.

अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्रीदिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. २०२० साली अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार होता.