नवी दिल्ली : महागाईच्या बाबतीत दिल्ली जागतिक स्तरावर १७४ व्या क्रमांकावर असली तरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी (एक्सपॅटस्) दिल्ली हेच सर्वांत महाग शहर आहे. ईसीए इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे. एक वर्षाच्या तुलनेत मूल्यवृद्धीचा दर कमी असूनही परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या महागड्या शहरांच्या यादीत दिल्लीचे नाव आघाडीवर आहे.
दिल्ली याबाबतीत विभागीय यादीत ४१ व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर दिल्ली १७४ वे सर्वांत महाग शहर आहे. गेल्यावर्षी दिल्ली २०६ व्या क्रमांकावर होती. विभागीय स्तरावर मुंबई ४८ व्या स्थानावर असून, जागतिक स्तरावर २२५ व्या क्रमांकावरून १९७ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. या यादीत सामील अन्य शहरांत पुणे विभागीय यादीत ५१ व्या क्रमांकावर, तर जागतिक स्तरावर २०९ व्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागीय स्तरावर ५२ व्या, तर जागतिक स्तरावर २१४ व्या स्थानी आहेत
विदेशी भारतीयांसाठी दिल्ली सर्वांत महागडे
महागाईच्या बाबतीत दिल्ली जागतिक स्तरावर १७४ व्या क्रमांकावर असली तरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी (एक्सपॅटस्) दिल्ली हेच
By admin | Published: September 14, 2015 12:58 AM2015-09-14T00:58:27+5:302015-09-14T00:58:27+5:30