नवी दिल्ली, दि. 25 - गेल्या अनेक दिवसांपासून जिओच्या फोनची वाट पाहणा-या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारपासून जिओ फोनच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली असून, 15 दिवसांच्या आत ग्राहकांना तो डिलिव्हरीच्या माध्यमातून मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 60 लाख जिओ फोन ग्राहकांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडनं दिली आहे. या फोनची डिलिव्हरी पहिल्यांदा छोट्या शहरांसह ग्रामीण भागात होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार जिओफोनची बुकिंग 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली होती. या फोनचं प्री-बुकिंग करण्यासाठी ग्राहकाला 500 रुपये भरावे लागत आहेत. माय जिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये फोनचं प्री-बुकिंग केलं गेलं. कंपनीने या फोनची किंमत सिक्युरिटी डिपॉझिटच्या माध्यमातून 1500 रुपये ठेवली आहे, तीन वर्षांनंतर या पैशांचा पूर्ण रिफंड ग्राहकांना मिळणार आहे. प्री बुकिंग करताना ग्राहकांना 500 रुपये भरावे लागणार आहेत. तर उर्वरित 1000 रूपये फोन मिळाल्यानंतर भरायचे आहेत.
Thank you for writing to us. We have started the delivery of JioPhone in phased manner to avoid inconvenience to(1/4)
— My LYF (@LYF_In) September 24, 2017
जिओफोनमध्ये ग्राहकांना मिळणार हे फिचर्स
जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे,या फोनवर व्हॉइस कॉलिंग मोफत मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.
रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर 128 जीबी मेमरी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट दिली आहे. तर 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल.
जिओच्या फोनवर दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रुपयांना मिळणार असून, आठवड्याचा प्लॅनसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ फोनच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही केबल पाहता येणार असून, त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 309 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या व्हॉइस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी विविध फिचर देण्यात आले आहेत. जिओ फोन हा भारतीय बनावटीचा आहे.
कशी कराल तुमच्या डिलिव्हरी स्टेट्सची पडताळणी ?
- माय जिओ अॅपवर गेल्यानंतर मॅनेज ऑप्शनमधून डिलिव्हरी स्टेट्स समजेल
- जिओ.कॉमवरही मॅनेज ऑर्डर ऑप्शनवर क्लिक केल्यास डिलिव्हरी स्टेट्स कळेल
- 18008908900नंबरवरूनही तुम्हाला डिलिव्हरी स्टेट्स समजू शकतं