Lokmat Money > बिझनेस न्यूज > Dell Layoffs: 'या' दिग्गज कम्प्युटर कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय? जाणून घ्या

Dell Layoffs: 'या' दिग्गज कम्प्युटर कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय? जाणून घ्या

Dell Layoffs: ही कम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून त्यांनी आपल्या साडेबारा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. जाणून घ्या यामागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:19 PM2024-08-07T14:19:46+5:302024-08-07T14:20:17+5:30

Dell Layoffs: ही कम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून त्यांनी आपल्या साडेबारा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. जाणून घ्या यामागचं कारण.

Dell Layoffs This giant computer company lay offs 12500 employees know reason implementing AI | Dell Layoffs: 'या' दिग्गज कम्प्युटर कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय? जाणून घ्या

Dell Layoffs: 'या' दिग्गज कम्प्युटर कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय? जाणून घ्या

Dell Layoffs: कम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी डेलने सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीने सेल्स डिव्हिजनमध्ये मोठी फेररचना जाहीर केली आहे. यामुळे ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि एआयवर लक्ष केंद्रित करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात आलीये. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीनं ६ ऑगस्ट रोजी अंतर्गत मेमोमध्ये कर्मचाऱ्यांना या बदलांची माहिती दिली, ज्यात सेल्स टीमचं सेंट्रलायझेशन करणं आणि नवीन एआय-केंद्रित सेल्स युनिट तयार करण्याच्या योजनेची रूपरेषा देण्यात आली.

न्यूजबाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये किती कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलेला आहे याची नेमकी संख्या अधिकृतरित्या निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा फटका बसला आहे. याचा परिणाम डेलच्या सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांवर झाला आहे.

ग्लोबल सेल्स मॉडनायझेशन अपडेट या नावानं हा मेमो सीनिअर एक्झिक्युटिव्ह बिल स्कॅनेल आणि जॉन बर्न यांच्याद्वारे पाठवण्यात आलाय. लाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, नेमक्या किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. विक्री विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी बंद किंवा फटका बसलेल्या सहकाऱ्यांना ओळखत असल्याचं सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपातीचा फटका प्रामुख्यानं व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना बसला आहे. त्यातील काही जण दोन दशकांपासून कंपनीत कार्यरत आहेत.

"यामध्ये सर्वाधिक मॅनेजर्स, डायरेक्टर्स आणि व्हिपी होते. र्केटिंग आणि ऑपरेशन्सवरही त्यांचा परिणाम झाला. आता प्रत्येक मॅनेजरमध्ये किमान १५ कर्मचारी आहेत," असं एका कर्मचाऱ्यानं नाव न लिहिण्याच्या अटीवर बिझनेस इनसाइडरला सांगितलं.

Web Title: Dell Layoffs This giant computer company lay offs 12500 employees know reason implementing AI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.