Join us

ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:33 AM

ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काईट) या व्यापारी संघटेने वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन यासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काईट) या व्यापारी संघटेने वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रचंड सूट थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणाचे उल्लंघन करणारी आहे, असे काईटने म्हटले आहे.काईटने गोयल यांना पाठविलेल्या पत्रात फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्यांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. पत्रात म्हटले आहे की, या कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेल प्रकरणात अथवा प्रचंड मोठ्या प्रमाणात सूट देणाऱ्या इतर कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये आपण तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही करीत आहोत.काईटने म्हटले की, वस्तू अथवा सेवा यांच्या विक्री किमतीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना बंदी आहे. तरीही या कंपन्या भरमसाट सूट देऊन किमतींवर परिणाम करीत आहेत. हा उघड उघड नियमभंग आहे. सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या सवलतीत मोठी वाढ करतात.>ई-कॉमर्स कंपन्या भरमसाट सूट देऊन कशा कमी किमतीत वस्तू विकतात, याचे पुरावे काईटने आपल्या पत्रासोबत वाणिज्यमंत्र्यांना पाठविले आहेत. या कंपन्या एफडीआय नियमाचे उघडपणे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या फेस्टिव्हल सेलवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.