Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख

BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख

BSNL Sim Demand Increase 4G/5G Service : जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅन महाग केले होते, ज्याचा फायदा बीएसएनएलला झाला आहे. इतर कंपन्यांचे प्लॅन महाग असल्याने बीएसएनएलचे प्लॅन आणि बेनिफिट्स बहुतांश युजर्सना आकर्षित करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 11:07 AM2024-08-06T11:07:00+5:302024-08-06T11:08:15+5:30

BSNL Sim Demand Increase 4G/5G Service : जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅन महाग केले होते, ज्याचा फायदा बीएसएनएलला झाला आहे. इतर कंपन्यांचे प्लॅन महाग असल्याने बीएसएनएलचे प्लॅन आणि बेनिफिट्स बहुतांश युजर्सना आकर्षित करत आहेत.

Demand for BSNL s SIM cards increases mobile users surge Government fixed date for 5G 4G details | BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख

BSNL Sim Demand Increase : BSNL च्या सिमकार्डची मागणी वाढली, मोबाईल युझर्सच्या उड्या; 5G, 4G साठी सरकारनं निश्चित केली तारीख

BSNL 4G/5G Service : जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅन महाग केले होते, ज्याचा फायदा बीएसएनएलला झाला आहे. इतर कंपन्यांचे प्लॅन महाग असल्याने बीएसएनएलचे प्लॅन आणि बेनिफिट्स बहुतांश युजर्सना आकर्षित करत आहेत. यामुळेच बीएसएनएलच्या सिमकार्डच्या विक्रीत झपाट्यानं वाढ झाली आहे. अलीकडेच देशात बीएसएनएलच्या ४जी आणि ५जी नेटवर्कची चर्चा सुरू झाली आहे, ज्यानं युझर्सना अधिकच आकर्षित केलंय.

५जी व्हिडिओ कॉलची ट्रायल

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच बीएसएनएलच्या ५जी नेटवर्कची चाचणी घेतली आणि त्याचा मदतीनं यशस्वीरित्या पहिला व्हिडीओ कॉल केला. युझर्ससाठी ही सेवा लवकरच रोलआउट होऊ शकते असं मंत्र्यांनी जाहीर केलं. बीएसएनएलच्या 5 जी नेटवर्कची क्षमता दर्शविण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. या घोषणेसोबतच बीएसएनएलची ५जी ची क्षमता दाखवून देणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिंधिया यांनी केलेल्या या घोषणेनंतर बीएसएनएलचे ५जी नेटवर्क बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यात बीएसएनएलची गुणवत्ता आणि कनेक्टिव्हीटी दिसून येते. तर आणखी एका व्हिडीओमध्ये बीएसएनएलचं ५ जी सिमकार्ड अनबॉक्सिंग केलं जात असल्याचं दिसून येत आहे.

येथे होऊ शकतं रोलआऊट

बीएसएनएलच्या ५जी नेटवर्कबाबत गेल्या काही काळापासून अनेक बातम्या आणि लीक समोर येत आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असे संकेत देण्यात आलेत की बीएसएनएल लवकरच निवडक ठिकाणी आपल्या ५जी नेटवर्कची चाचणी सुरू करू शकते. दिल्लीतील कॅनॉट प्लेस, आयआयटी हैदराबाद, जेएनयू कॅम्पस दिल्ली, आयआयटी दिल्ली, संचार भवन दिल्ली, गुरुग्राममधील निवडक ठिकाणं, बंगळुरूमधील सरकारी कार्यालयं आणि दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर सह भारतातील महत्त्वाच्या भागात ही सेवा सुरू केली जाऊ शकते. 

मार्च २०२५ पर्यंत १ लाख टॉवर्स

ऑक्टोबर अखेरपर्यंत ८० हजार टॉवर्स आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत उर्वरित २१ हजार टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत ४ जी नेटवर्कचे एक लाख टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे टेलिव्हिजन वेगाने डाऊनलोड आणि पाहण्यास मदत होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्र्यांनी दिली. आपण या ४ जी कोअरवर ५जी सेवा वापरू शकतो. ५जी सेवेसाठी टॉवर्समध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यावर काम सुरू आहे. आम्ही लवकरच ४ जी ते ५ जी पर्यंतचा प्रवास पूर्ण करू, असं सिंधिया म्हणाले. अनेक ग्राहक प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून बीएसएनएलकडे वळत आहेत. आमची सेवा वेगवान होईल, असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं

Web Title: Demand for BSNL s SIM cards increases mobile users surge Government fixed date for 5G 4G details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.