नवी दिल्ली :भारतातून होणाऱ्या निर्यातीत सातत्याने घसरण होत असताना आयातीमध्ये मात्र वाढ झाल्याने व्यापार तूट वाढली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच सात टक्क्यांनी घसरला आहे आणि तो यापुढेही दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, महागाईत आणखी वाढ होण्यासह मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता येईल, त्याचा मोठा फटका नागरिकांना बसू शकता, अशी भीती तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये देशाची निर्यात २० महिन्यांत प्रथमच १.१५ टक्क्यांनी घसरून ३३ अब्ज डॉलरवर आली आहे, तर देशाची आयात एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी वाढून ६१.६८ अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे एकूण व्यापार तूट २८.६८ अब्ज डॉलर झाली आहे.
नेमका कशामुळे बसतोय फटका? -
- रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेल आणि वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ
- चीनमधील कोरोना निर्बंधांमुळे पुरवठा साखळीतील अडथळे
- आयातीची वाढलेली मागणी
- बिघडलेले आयात-निर्यात धोरण
सरकारने काय पावले उचलली?
- अलीकडच्या काही महिन्यांत सरकारने आयात कमी करण्यासाठी काही पावले उचलली आहेत.
- सोन्यासारख्या वस्तूंवरील आयात शुल्क वाढविणे
- अनेक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणे
- देशात इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वाढविणे
- मात्र, त्याचा खूप प्रभाव आयात कमी होण्यावर होत नसल्याचे दिसत आहे.
- २० महिन्यांत प्रथमच ऑगस्टमध्ये देशाची निर्यात १.१५ टक्क्यांनी घसरून ३३ अब्ज डॉलरवर.
- ३७%नी देशाची आयात वाढली असून, ती ६१.६८ अब्ज डॉलरवर पोहोचली.
- १२५ अब्ज डॉलरवर व्यापार तूट पहिल्या पाच महिन्यात.