नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या प्रभावातून रिअल इस्टेट क्षेत्र सावरले असून, मागील दोन वर्षांत ५० लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री ५२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर गेली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नाईट फ्रँकच्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री तब्बल २८३ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या तिमाहीत ८९ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ३२ टक्के वाढ झाली आहे.
१५५ टक्क्यांनी वाढ
५० लाख ते १ कोटी रुपये किंमत असलेल्या घरांची विक्री २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत १५५ टक्क्यांनी, तिसऱ्या तिमाहीत १०७ टक्क्यांनी आणि चौथ्या तिमाहीत ८ टक्क्यांनी वाढली. ५० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांची विक्री २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत १७५ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ८२ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ८ टक्के वाढली, असे नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे.
५० लाख रुपयांवरील घरांना मागणी वाढली; रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनातून सावरले
नाईट फ्रँकच्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री तब्बल २८३ टक्क्यांनी वाढली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:13 AM2022-03-23T06:13:17+5:302022-03-23T06:13:28+5:30