Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

श्रीराम मंदिरामुळे मुरादाबादमधील शिल्पकारांच्या हातालाही मोठे काम मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:58 AM2024-01-12T10:58:08+5:302024-01-12T10:58:41+5:30

श्रीराम मंदिरामुळे मुरादाबादमधील शिल्पकारांच्या हातालाही मोठे काम मिळणार आहे.

Demand for the removal of the idols of Sri Rama; A manufacturing plant at Moradabad will make a replica of Ramlalla's statue | श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

मुरादाबाद: अयोध्येतील भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे श्रीरामाच्या पितळी मूर्तींची मागणी वाढली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पितळी मूर्ती तयार केल्या जातात. श्रीराम मंदिरामुळे मुरादाबादमधील शिल्पकारांच्या हातालाही मोठे काम मिळणार आहे. मुरादाबाद येथे अत्यंत सुबक कलाकुसर केलेल्या वस्तू तसेच देवदेवतांच्या मूर्ती तयार करण्याचे काम चालते. अयोध्या येथे राम मंदिरामध्ये रामलल्लाची जी मूर्ती उभारली जाईल तशाच पद्धतीच्या पितळेच्या मूर्ती बनविण्यासाठी भाविकांकडून भविष्यात मोठी ऑर्डर येऊ शकते हे लक्षात घेऊन तेथील शिल्पकारांनी आता तशी पूर्वतयारी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)

मागणी इतकी की...

याआधी मुरादाबादमधील शिल्पकारांनी भगवान राम, सीतामाई, हनुमान यांच्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्यांनाही सध्या मोठी मागणी आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सामान्य माणसे या मूर्ती विकत घेत आहेत. ही मागणी इतकी मोठी आहे की ती पूर्ण करणे अशक्य होईल की काय अशी चिंता आता या व्यावसायिकांना भेडसावत आहे.

पंधरा दिवसांत तयार हाेते एक मूर्ती

  • मुरादाबादमधील व्यावसायिकांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत भगवान रामाच्या पितळी मूर्तींना खूप मागणी नव्हती; मात्र अयोध्येतील राम मंदिराची उभारणी जसजशी पूर्ण होऊ लागली तशी या मूर्तींना असलेली मागणीही वाढत गेली.
  • एखादी पितळी मूर्ती घडविण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतात. मुरादाबादमधील पितळी मूर्ती तसेच भांड्याकुंड्यांच्या व्यवसायामुळे तेथील व्यावसायिकांना, शिल्पकारांना तसेच कामगारांना अधिक चांगले दिवस पाहायला मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Demand for the removal of the idols of Sri Rama; A manufacturing plant at Moradabad will make a replica of Ramlalla's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.