लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या निर्मिती खर्चात वाढ होऊन त्याचा अप्रत्यक्ष फटका कृषी क्षेत्राला बसणार आहे. म्हणून ट्रॅक्टरच्या सर्व सुट्या भागांवर १८ टक्केच जीएसटी लावण्यात यावा, अशी मागणी ‘ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने(टीएमए) केली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ‘जीएसटी’मधील कर वर्गीकरणाची नवी सारणी सोमवारी जाहीर केली. त्यात जीएसटीचा दर कमी करून १८ टक्क्यांवर आणण्यात आलेल्या ६६ वस्तूंमध्ये ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांचाही समावेश आहे. केंद्राच्या या निर्णयाचे ‘टीएमए’ने स्वागत केले आहे. मात्र ट्रॅक्टरचे इंजिन, ट्रान्समिशन, एक्सेल, टायर-ट्युब आदी सुटे भाग अद्यापही २८ टक्क्यांच्या जीएसटी वर्गवारीतच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या निर्मिती खर्चात तब्बल २५ हजारांची वाढ होणार आहे. हा वाढीव बोजा खरेदीदार शेतकऱ्यांवरच पडणार आहे.
म्हणून अन्य गाड्यांच्या श्रेणीत ट्रॅक्टरच्या सुट्या भागांची गणना करू नये, तर ट्रॅक्टर आणि त्यांच्या सुट्या भागांवर सरसकट १८ टक्केच सीएसटी आकारण्यात यावा, असे ‘टीएमए’च्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष टी. आर. केसवन यांनी म्हटले आहे.
ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी करण्याची मागणी
ट्रॅक्टरच्या काही सुट्या भागांवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या निर्मिती खर्चात वाढ होऊन त्याचा
By admin | Published: June 15, 2017 02:17 AM2017-06-15T02:17:55+5:302017-06-15T02:17:55+5:30