Join us

तेलगळतीप्रकरणी भरपाईची मागणी

By admin | Published: March 07, 2017 3:47 AM

मच्छिमारांचे १३५.३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही रक्कम विमा कंपन्यांकडून वसूल करण्याच्या सूचना तामिळनाडू सरकारने जलवाहतूक महासंचालकास दिल्या

चेन्नई : जानेवारीमध्ये दोन जहाजांची टक्कर होऊन झालेल्या तेल गळतीमुळे मच्छिमारांचे १३५.३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही रक्कम विमा कंपन्यांकडून वसूल करण्याच्या सूचना तामिळनाडू सरकारने जलवाहतूक महासंचालकास दिल्या आहेत.येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी तेल गळतीमुळे बेरोजगार झालेल्या ३0 हजार मच्छिमारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, चेन्नई, तिरुवेल्लूर आणि कांचीपुरम जिल्ह्यांतील १0४ किमी किनारपट्टीला तेल गळतीचा फटका बसला. त्यामुळे मच्छिमारांची उपजिविका ठप्प झाली. १३५.३५ कोटी रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. ही रक्कम विमा कंपन्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे पत्र जलवाहतूक महासंचालकांस पाठविण्यात आले आहे.