Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

Demat Account : आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:55 PM2022-06-19T12:55:40+5:302022-06-19T14:15:28+5:30

Demat Account : आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात.

demat account demat trading account will be frozen if nomination not filed by 31 march 2023 see process | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

नवी दिल्ली : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. पॅन कार्ड आणि आधार लिंक (Aadhaar-PAN Link) करण्यापासून ट्रेडिंग-डिमॅट खात्यापर्यंत (Demat Account) नॉमिनीचे नाव नोंदविणे अनिवार्य आहे. सेबीने 31 मार्च 2022 रोजी नॉमिनेशनची (Nomination) अंतिम मुदतही घोषित केली होती. मात्र, आता सेबीने ती एक वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजेच आता गुंतवणूकदार हे काम 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात.

दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे डिमॅट किंवा ट्रेडिंग खाते आहे, त्यांच्यासाठी सेबीने 31 मार्चपर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करण्याचा नियम केला आहे. आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते आता 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात. यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. आता एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सेबीकडून परिपत्रक जारी
सेबीने यासाठी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सेबीने म्हटले आहे की, 'नॉमिनी करण्यासाठी साक्षीदाराची गरज नाही. नॉमिनीच्या फॉर्मवर खातेदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. याशिवाय, ई-साइन सुविधेचा वापर करून ऑनलाइन भरलेल्या नामांकन/घोषणा फॉर्मसाठी साक्षीदाराची आवश्यकता नाही. मात्र, जर खातेदाराने स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचा ठसा वापरल्यास, फॉर्मवर साक्षीदाराची स्वाक्षरी देखील असणे आवश्यक आहे.'

असे करा डिमॅटमध्ये नॉमिनेशन...
- जर तुम्हाला तुमच्या खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव देखील जोडायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही नामांकन फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करून मुख्य कार्यालयाच्या (ज्या ब्रोकर कंपनीने डिमॅट खाते उघडले आहे. उदा. zerodha) पत्त्यावर कुरियर करू शकता.
- तुमच्या ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यावर नॉमिनेशन लागू होईल, हा नॉमिनी तुमच्या डिमॅट खात्यात जोडला जाईल. हेच नॉमिनेशन तुमच्या कॉइन (म्युच्युअल फंड) होल्डिंगसाठीही लागू होईल.
- तुम्हाला नॉमिनेशन फॉर्मसोबत नॉमिनीचा आयडी प्रूफ पाठवावा लागेल.
- यासाठी तुम्ही आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणताही आयडी पुरावा पाठवू शकता.
- तुमचे खाते उघडल्यानंतर आणि एखाद्याला नॉमिनी बनवल्यानंतर तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल, तर तुम्हाला 25+18 टक्के जीएसटी शुल्क भरावे लागेल.
- यासाठी, तुम्हाला अकाउंट मॉडिफिकेशन फॉर्मसह नॉमिनेशन फॉर्मची हार्ड कॉपी पाठवावी लागेल.

Web Title: demat account demat trading account will be frozen if nomination not filed by 31 march 2023 see process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.