Join us

Demonetisation: नोटाबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवा; RBI चे सर्व बँकांना आदेश, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 8:41 AM

सर्व बँकांनी ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा असं RBI नं म्हटलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये देशभरात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली होतीहजारोंच्या संख्येने बँकांच्या बाहेर या नोटा परत करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.आरबीआयनं नोटाबंदी काळात १५ लाख ४१ हजार कोटी चलनात होते. त्यातील १५ लाख ३१ हजार कोटी परत बँकेत जमा झालेत अशी माहिती दिली.

नवी दिल्ली – २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदी(Demonetization)काळातील सर्व CCTV रेकॉर्डिंग सांभाळून ठेवा असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) ने देशातील सर्व बँकांना दिले आहे. देशातील तपास यंत्रणा नोटाबंदी काळातील अनेक प्रकरणाचा तपास करत आहेत. काही खटले न्यायालयात प्रलंबित आहेत असं RBI नं म्हटलं आहे. त्यामुळे बँकेतील CCTV फुटेज सांभाळून ठेवा आणि तपासात सहकार्य करावं असं RBI नं म्हटलं आहे.

RBI नं आदेशात सांगितलंय की, सर्व बँकांनी ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा. कारण तपास यंत्रणा बेकायदेशीररित्या नोटांचा साठा करणाऱ्यांची चौकशी करत आहे. RBI नं पुढील आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सांभाळण्याचे आदेश दिलेत. RBI च्या या आदेशामुळे देशात साडेचार वर्षाहून अधिक नोटाबंदी काळातील घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास यंत्रणांची चौकशी पूर्ण झाली नाही हे स्पष्ट होतं. RBI च्या डेटानुसार ९९ टक्क्याहून अधिक ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या होत्या.

नोटाबंदी काळात १५ लाख ४१ हजार कोटी चलनात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये देशभरात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हजारोंच्या संख्येने बँकांच्या बाहेर या नोटा परत करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. नोटाबंदीच्या घोषणेच्या २१ महिन्यानंतर आरबीआयनं याबाबत आकडेवारी सादर केली होती. त्यात म्हटलं होतं की, ९९.३ टक्के जुन्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. बुधवारी आरबीआयनं नोटाबंदी काळात १५ लाख ४१ हजार कोटी चलनात होते. त्यातील १५ लाख ३१ हजार कोटी परत बँकेत जमा झालेत अशी माहिती दिली.

आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या काळात ५०० आणि १ हजार रुपयांच्या १५ लाख ४१ हजार कोटी चलनात होते. त्यातील १५ लाख ३१ हजार कोटी नोटा बँकांकडे जमा झाल्या. मार्च २०१८ पर्यंत बँक नोट सर्क्युलेशनमध्ये ३७.७ टक्के वाढले होते. २०१७ पर्यंत ५०० आणि २ हजारांच्या नोटा सर्क्युलेशनचा वाटा ७२.७ टक्के इतका होता.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनिश्चलनीकरणनरेंद्र मोदी