Demonetization News: केंद्र सरकारने 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत RBI हळूहळू बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेईल. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जाऊन बदलता येणार आहेत.
फॉर्म भरावा लागेल
नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागेल का, आयडी प्रूफ लागेल का, असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार, म्हटले आहे की, 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आयडी प्रूफ द्यावा लागणार नाही किंवा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. 2000 रुपयांच्या 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा एकाच वेळी सहज बदलता येतील.
SBI clarifies that the facility of exchange of Rs 2000 denomination bank notes upto a limit of Rs 20,000 at a time will be allowed without obtaining any requisition slip pic.twitter.com/TP6t2n9oeJ
— ANI (@ANI) May 21, 2023
केंद्रावरही नोटा बदलता येणार
ग्रामीण भागात राहणारे लोक बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला भेट देऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात. मात्र केंद्रावर फक्त 2000 रुपयांच्या दोन नोटा म्हणजेच 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येतील. बिझनेस करस्पॉन्डंट बँकेसारखे काम करतात. ते गावकऱ्यांना बँक खाती उघडण्यास मदत करतात. ते बँकेचे छोटे-मोठे व्यवहारही करतात.
आरबीआय कार्यालयातही नोटा बदलता येतील
RBI ची देशभरात 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत, परंतु 2000 रुपयांच्या नोटा अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरममध्ये बदलता येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.