दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे निदर्शने
By admin | Published: November 01, 2014 9:48 PM
गडहिंग्लज : जवखेड येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ येथील प्रांत कचेरीसमोर मागासवर्गीय अन्याय निवारण कृती समिती व पुरोगामी विचार कृती दल यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली.
गडहिंग्लज : जवखेड येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ येथील प्रांत कचेरीसमोर मागासवर्गीय अन्याय निवारण कृती समिती व पुरोगामी विचार कृती दल यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली.मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन प्रांतांना देण्यात आले. निवेदनात जवखेड हत्याकांडाची चौकशी सीबीआयतर्फे करावी, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा, हत्याकांडग्रस्त कुटुंबांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. राजा शिरगुप्पे, मल्लाप्पा कांबळे, प्रा. शिवाजीराव होडगे, आशपाक मकानदार, संग्राम सावंत, चंद्रकांत कांबळे, शिवानंद घस्ती, गणपती पणकुडी, प्रकाश कांबळे यांची भाषणे झाली.निदर्शनात रमजान अत्तार, साताप्पा कांबळे, प्रा. शशिकांत संघराज, जे. व्ही. सरतापे, प्रा. कोल्हापुरे, मुश्ताक मुल्ला, महेश सलवादे, शिवाजी नाईक, वसंत शेटके, मोहन बारामती, विमल नाईक, आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. --------------फोटो ओळ : (फोटो कोलडेस्क)गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर निदर्शने करताना मागासवर्गीय अन्याय निवारण कृती समिती आणि पुरोगामी विचारकृती दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया : मजिद किल्लेदार)