Join us

तिमाही निकालांवर वाटचाल अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 5:21 AM

Share Market गतसप्ताहामध्ये बाजाराचा प्रारंभ वाढीनेच झाला. त्यानंतर, दररोज निर्देशांकाची वाढीव पातळी कायम राहिली.  परकीय वित्तसंस्थांकहून सातत्याने होत असलेली गुंतवणूक आणि कोरोनावरील लस लवकरच येण्याची चिन्हे, यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढला.

प्रसाद गो. जोशीलोकमत न्यूज नेटवर्क परकीय वित्तसंस्थांची कायम असलेली खरेदी, कोरोनावरील लसीबाबतचे आशादायक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण आणि जीएसटीच्या संकलनामध्ये झालेली वाढ, यामुळे गतसप्ताहातही शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. निफ्टीने प्रमथच पार केलेला १४ हजारांचा टप्पा आणि सेन्सेक्सचा नवा उच्चांक या बाजारातील महत्त्वपूर्ण घडामोडी होत. 

गतसप्ताहामध्ये बाजाराचा प्रारंभ वाढीनेच झाला. त्यानंतर, दररोज निर्देशांकाची वाढीव पातळी कायम राहिली.  परकीय वित्तसंस्थांकहून सातत्याने होत असलेली गुंतवणूक आणि कोरोनावरील लस लवकरच येण्याची चिन्हे, यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढला. देशांतर्गत वित्तसंस्थांनी या सप्ताहातही विक्री कायम राखली आहे.

६८ हजार कोटींची विक्रमी गुंतवणूकपरकीय वित्तसंस्थांनी डिसेंबर महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये ६२,०१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय ६,५४२ कोटी रुपयांची बॉण्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या महिनाभरात या संस्थांनी ६८,५५८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तिसऱ्या महिन्यात या संस्थांनी गुंतवणूक केली आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, मोठा हिस्सा हा भारताकडे येत आहे.  नोव्हेंबर महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ६०,३५८ कोटी सर्वाधिक गुंतवणूक भारतीय बाजारामध्ये केली.

परिणामकारक घटनाया सप्ताहापासून विविध आस्थापनांचे तिमाही निकाल येण्यास प्रारंभ होणार असून, त्याची सुरुवात टीसीएसपासून होणार आहे. गतसप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेली जीएसटी संकलनाची बातमी बाजाराला बळ देणारी आहे. 

सप्ताहातील स्थितीनिर्देशांक    बंद मूल्य    बदलसंवेदनशील    ४७,८६८.९८    +८९५.४४निफ्टी           १४,०१८.५०    +२६९.२५मिडकॅप    १८,१६४.४८    +४८७.७८स्मॉलकॅप       १८,२६१.०३    +५८५.५०

टॅग्स :शेअर बाजार