Lokmat Money > बिझनेस न्यूज > Piggy Bank ऐवजी 'या'मध्ये जमा करा मुलांचे पैसे, महिन्याला ₹५०० नं जमेल मोठा फंड

Piggy Bank ऐवजी 'या'मध्ये जमा करा मुलांचे पैसे, महिन्याला ₹५०० नं जमेल मोठा फंड

लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लावायला हवी, असं म्हटलं जातं. म्हणूनच अनेक पालक आपल्या मुलांना घरी पिगी बँक आणून देतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:53 AM2023-11-29T09:53:27+5:302023-11-29T09:54:38+5:30

लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लावायला हवी, असं म्हटलं जातं. म्हणूनच अनेक पालक आपल्या मुलांना घरी पिगी बँक आणून देतात.

Deposit children s money in post office recurring deposit scheme instead of Piggy Bank a big fund of rs 500 per month investment tips | Piggy Bank ऐवजी 'या'मध्ये जमा करा मुलांचे पैसे, महिन्याला ₹५०० नं जमेल मोठा फंड

Piggy Bank ऐवजी 'या'मध्ये जमा करा मुलांचे पैसे, महिन्याला ₹५०० नं जमेल मोठा फंड

Post Office Recurring Deposit : लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लावायला हवी, असं म्हटलं जातं. म्हणूनच अनेक पालक आपल्या मुलांना घरी पिगी बँक आणून देतात. मुलं पिगी बँकेत जे काही पैसे ठेवतात, ते फक्त जमा होतात, त्यातून त्यांना कोणताही फायदा मिळत नाही. त्यामुळे बचतीसोबतच तुम्ही तुमच्या मुलांना गुंतवणुकीचा मंत्रही शिकवला पाहिजे आणि पिगी बँकेऐवजी अशा योजनेत गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे, ज्यामध्ये ते त्यांना मिळणारे पैसे नियमितपणे गुंतवू शकतात. इतकंच नाही तर त्यावर चांगलं व्याज मिळवू शकतात.

यासाठी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आरडी ही देखील एक प्रकारची पिगी बँक आहे, ज्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी लागते आणि मॅच्युरिटी झाल्यावर ही रक्कम व्याजासह मिळते. बँकांमध्ये आरडी सुविधा उपलब्ध आहे. तर पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक सातत्यानं ५ वर्षांसाठी करावी लागते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये स्वारस्य व्याजही उत्तम आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मुलांना जास्त पैसे मिळतात तेव्हा त्यांचा आनंद काही औरच असतो आणि त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्त्वही कळतं. पोस्ट ऑफिस RD बद्दल आज आपण जाणून घेऊ.

५०० रुपये जमा केल्यास किती परतावा
पोस्ट ऑफिस आरडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते फक्त १०० रुपये प्रति भरून सुरू केली जाऊ शकते. यामध्ये कमाल गुंतवणूकीला मर्यादा नाही. सध्या या आरडीवर ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मुलांसाठी दरमहा ५०० रुपये देखील जमा केले तर ते एका वर्षात ६ हजार रुपये जमा होतील. ५ वर्षांत ती रक्कम ३० हजार रुपये होईल. ६.७ टक्के दराने यावर ५,६८१ रुपये व्याज दिलं जाईल. तसंच मॅच्युरिटीवर ३५,६८१ रुपये दिले जातील. तीच रक्कम पिगी बँकेत ठेवली तर तुम्हाला केवळ ३०,००० रुपये मिळतील. यावर व्याजाचा लाभ मिळणार नाही.

कसं सुरू कराल अकाऊंट?
कोणतीही प्रौढ व्यक्ती आरडी खातं उघडू शकते. आई किंवा वडील अल्पवयीन मुलांच्या नावे खातं उघडू शकतात. याशिवाय १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन मुलांना त्यांच्या नावे खातं सुरू करता येतं. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये जॉईंट खात्याची  सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय कितीही आरडी खाती उघडता येतात.

Web Title: Deposit children s money in post office recurring deposit scheme instead of Piggy Bank a big fund of rs 500 per month investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.