Post Office insurance policy: आज आम्ही तुम्हाला अशा इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीनं तुमचं संपूर्ण आयुष्य कव्हर होतं. पोस्टल लाईफ इन्शुरन्स IRDAI च्या अंडर येत नाही. तसंच यामध्ये पॉलिसीचा लाभ घेणाऱ्यांना बंपर बोनसचाही लाभ मिळतो. दरवर्षी पोस्ट ऑफिसकडून बोनसची घोषणा केली जाते.
या इन्शुरन्स पॉलिसीचं नाव आहे Post Office Gram Suraksha. ही एकप्रकारची पोस्टल लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे (RPLI) जी १९९५ मध्ये सुरू करण्यात आली होती. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांसाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये कमीतकमी वय हे १९ वर्षे तर जास्तीतजास्त पॉलिसी घेण्याचं वय ५५ वर्षे आहे. तर मिनिमम सम अशॉर्ड १० हजार रूपये आणि मॅक्सिमम सम अशॉर्ड १० लाख रूपये आहे. या पॉलिसीवर तुम्हाला ४ वर्षांनी कर्ज घेण्याचीही सुविधा देण्यात येते. तसंच तीन वर्षांनंतर तुम्ही पॉलिसी सरंडरही करू शकता. इंडिया पोस्टल लाईफ इन्शुरन्स मोबाईल अॅपवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रति हजार सम अशॉर्डवर ६० रूपयांचा बोनस दिला जातो. याचाच अर्थ एका लाखावर ६ हजार रूपयांचा बोनस दिला जातो.
या पॉलिसीची विशेष बाब म्हणजे विमा धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मॅच्युरिटीचा लाभ दिला जातो. तसंच विमा धारकाचं वय ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यावर मॅच्युरिटीचा लाभ दिला जातो. या अंतर्गत मॅच्युरिटीची मर्यादा ५०,५५,५८ आणि ६० वर्षे असू शकते.
किती असेल प्रीमिअम?
प्रीमिअम अमाऊंटबद्दल सांगायचं झाल्या RPLI स्कीम अंतर्गत कोणी १९ व्या वर्षी ५ लाखांचा अॅशोर्ड घेतला तर त्याचं मॅच्युरिटी वय ६० वर्षे असेल, तर त्याला प्रत्येक महिन्याला ७०५ रूपये भरावे लागतील. ५८ वर्षांच्या मॅच्युरिटी प्रीमिअमवर७३२ रूपये आणि ५५ वर्षांच्या मॅच्युरिटी प्रीमिअमवर ७५८ रूपये आणि ५० वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमिअम ८१० रूपये असेल. ६० वर्षांच्या मॅच्युरीटीसाठी मॅच्युरिटी अमाऊंट १७.३० लाख रूपये, ५८ वर्षांसाठी १६.७० लाख आणि ५५ वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी १५.८० लाख, ५० वर्षांसाठी १४.३० लाख रूपये असेल.