Lokmat Money > बिझनेस न्यूज > हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...

हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:42 PM2023-10-13T14:42:07+5:302023-10-13T14:42:36+5:30

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे.

Despite its small population, Israelis hold 17 percent of the world's dollars, so many billionaires | हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...

हलक्यात घेऊ नका! लोकसंख्येने कमी असले तरी, जगाच्या १७ टक्के डॉलर्सवर इस्त्रायलींचा कब्जा, एवढे अब्जाधीश...

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धावर पूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, इस्त्रायलने हमासवर हल्ले वाढवले आहेत. इस्त्रायल विरोधात इस्रायलची स्थापना झाली तेव्हापासून त्याच्या शेजारी राष्ट्रांशी तणाव आहे. अनेकवेळा हे देश समोरा-समोर आले आहेत. पण प्रत्येक वेळी इस्रायल जिंकला. इस्रायलचे बहुतेक शेजारी देश इस्लामिक आहेत. लोकसंख्येमध्ये ज्यूंची संख्या जगात खूपच कमी असली तरीही कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत ज्यू मागे नाहीत. जगभरात अनेक ज्यू अब्जाधीश आहेत.

हमाससोबतच्या युद्धादरम्यान फोर्ब्सची एक यादी समोर आली आहे,या यादीमध्ये ज्यू अब्जाधीशांच्या संपत्तीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. 

Paytm पेमेंट्स बँकेवर RBI ची मोठी कारवाई, ₹५.३९ कोटींचा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

१९४८ सालीच ज्यूंसाठी एक वेगळा देश निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, याला अमेरिकेचा सर्वाधिक पाठिंबा होता. १९४८ च्या तुलनेत सध्या जगभरात ज्यूंची लोकसंख्या कमी झाली आहे. मात्र ज्यू अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

जगभरात सुमारे १.७५ कोटी ज्यू आहेत. इस्रायलमध्ये फक्त ७ मिलियन ज्यू राहतात, जे इस्रायलच्या एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के आहे, तर जगातील ४३ टक्के ज्यू इस्रायलमध्ये राहतात. इस्रायलशिवाय अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वाधिक ज्यू राहतात. या दोन देशांमध्ये ज्यूंची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४३ टक्के आहे. याशिवाय फ्रान्स, ब्रिटन, अर्जेंटिना, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि ब्राझील हेही ज्यू आहेत. भारतात सुमारे ८ हजार ज्यू राहतात.

दरम्यान, फोर्ब्सने ज्यू-अब्जाधिशांची २०२२ ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २६७ ज्यू अब्जाधीशांची नावे आहेत. ज्यांची एकूण संपत्ती १.७ ट्रिलियन डॉलर्स आहे. जे भारताच्या एकूण जीडीपीच्या ६० टक्के आहे. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या २०२३ च्या यादीत जगातील चौथ्या क्रमांकावर एक ज्यू आहे. ज्यांचे नाव लॅरी एलिसन आहे, फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती १०७ अब्ज डॉलर्स आहे. त्यांचा व्यवसाय तंत्रज्ञान क्षेत्रात आहे. लॅरी एलिसनच्या तुलनेत एकही भारतीय अब्जाधीश नाही. मार्क झुकरबर्गला कोणत्याही ओळखीची गरज नाही, फेसबुक हे त्यांचे योगदान आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण आता त्यांच्या संपत्तीत थोडीशी घट झाली आहे, सध्या फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत ६४.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते १६व्या स्थानावर आहेत. एवढेच नाही तर जगातील ११ ते १७ टक्के डॉलर्सवर ज्यू अब्जाधीशांचे नियंत्रण आहे.

बऱ्यापैकी ज्यू अब्जाधीश अमेरिकेत राहतात. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सर्वात श्रीमंत अब्जाधीश ज्यू लॅरी एलिसन आहे, दुसऱ्या क्रमांकावर लॅरी पेज आहे, ज्यांचे गुगल कंपनीशी संबंध आहेत, त्यांच्याकडे एकूण ८५.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तिसर्‍या क्रमांकावर सर्जी ब्रिन आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ८१.८ अब्ज डॉलर आहे. चौथा सर्वात श्रीमंत ज्यू स्टीव्ह बाल्मर आहे, ज्याची संपत्ती ७८.९ अब्ज डॉलर आहे. 5व्या स्थानावर ब्लूमबर्गचे मालक मायकेल ब्लूमबर्ग आहेत, त्यांची संपत्ती ७६.८ अब्ज आहे. स्टारबक्सचे मालकही ज्यू आहे. डेल टेक्नॉलॉजीजचे मालक मायकेल डेल हे देखील ज्यू आहेत, त्यांची एकूण संपत्ती ५२ अब्ज डॉलर आहे. व्हॉट्सअॅपचे जान कौम हे देखील एक ज्यू आहेत, त्यांची एकूण संपत्ती १३.३ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार ज्यू अब्जाधीश प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. सर्वाधिक अब्जाधीश ज्यू अमेरिका आणि फ्रान्समध्ये राहतात.

Web Title: Despite its small population, Israelis hold 17 percent of the world's dollars, so many billionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.