मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने विकता यावीत, यासाठी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘अस्मिता बाजार’चे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या अंतर्गत ‘अस्मिता अॅप’च्या माध्यमातून महिला बचतगटांना ई-कॉमर्सची संधी मिळणार आहे.
अस्मिता अॅपमुळे खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. याशिवाय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांना दजेर्दार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अस्मिता प्लस हे फोल्डींग नसलेले, लिकप्रुफ टेक्नॉलॉजी असलेले व अधिक लांबीचे सॅनिटरी नॅपकीन आहे. यात शरीरावर रॅशेस, ओलसरपणा जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे. ५ रुपयांमध्ये हे सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होईल.
बचतगटांची उत्पादने विका आता ऑनलाइन
ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने विकता यावीत, यासाठी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘अस्मिता बाजार’चे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:07 AM2019-03-09T05:07:33+5:302019-03-09T05:07:46+5:30