सुनील काकडे, वाशिम
ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे, वाढलेली गरीबी व बेरोजगारी कमी करणे, ग्रामीण भागातील गुंतवणुकीस चालना देणे आदी उद्देश समोर ठेऊन २८ जिल्ह्यांमधील ९९ आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये राष्ट्रीय रुर्बन मिशन अर्थात ‘एनआरयूएम’ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून शहरांप्रमाणेच खेड्यांमध्येही विकासगंगा पोहचविण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या या अभियानांतर्गत ‘रुर्बन’ समुहाच्या सहाय्याने ग्रामविकास केला जाणार असून गाव समुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे, तसेच शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही पायाभूत सुविधा पुरविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दुर करणे, ग्रामीण भागात आर्थिक व तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, अभियानांतर्गत निवडलेल्या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणे, गुंतवणुकीस चालना देणे आदी उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहेत.
यासाठी केंद्र शासनाने आदिवासी भागातील ११ जिल्ह्यांमधील ४९ तालुके आणि बिगर आदिवासी भागातील १७ जिल्ह्यांमधील ५० तालुक्यांची अभियान राबविण्याकरिता निवड केली असून गाव समुहाचा विकास करताना केंद्र व राज्यशासनाच्या योजना केंद्राभिमुख पद्धतीने राबविल्या जाणार आहेत.
यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि समूहस्तरीय समित्या गठीत केल्या जातील. जिल्हास्तरावर जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार असून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिनस्त तो कार्यरत राहील. समूहस्तरावर समूह विकास आणि व्यवस्थापन कक्ष कार्यरत केला जाणार असून एककेंद्राभिमुखता तज्ज्ञ व ग्रामविकास व्यवस्थापन तज्ज्ञाचा अंतर्भाव या समितीमध्ये केला जाणार आहे.
‘रुर्बन’द्वारे खेड्यांमध्येही पोहोचणार विकासगंगा
ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे, वाढलेली गरीबी व बेरोजगारी कमी करणे, ग्रामीण भागातील गुंतवणुकीस चालना देणे
By admin | Published: January 21, 2016 03:09 AM2016-01-21T03:09:11+5:302016-01-21T03:09:11+5:30