Join us

धनत्रयोदशीच्या दिवशी SBI, ICICI बँकिंग स्टॉक्समध्ये जोरदारी खरेदी; निफ्टी बँकेची १०६० अंकांनी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 4:11 PM

Dhanteras 2024: भारतीय शेअर बाजारातील वाढ बँकिंग स्टॉक्समुळे झाली आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

Stock Market : दिवाळीचा सण भारतीय शेअर बाजारासाठी शुभ ठरत आहे. गेल्या ४ आठवड्यापासून कोसळत असेलल्या बाजाराला काल वसूबारसच्या दिवशी ब्रेक लागला. आजचा धनत्रयोदशीचा पवित्र दिवसही शेअर बाजारासाठी चांगला ठरला आहे. दिवसभर बाजारात घसरण सुरू होती. पण शेवटच्या तासात बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली कामगिरी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ३६४ अंकांच्या उसळीसह ८०,३६९ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२८ अंकांच्या उसळीसह २४,४६६ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतार?आजच्या व्यवहारात बीएसईवर झालेल्या ३९८२ शेअर्सपैकी २२१४ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १६४३ शेअर्स तोट्यासह बंद झाले. १२५ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १६ स्टॉक्स वाढीसह आणि १४ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३१ शेअर्स वाढले तर १९ शेअर्स घसरून बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये फेडरल बँक ८.४९ टक्के, एसबीआय ५.१३ टक्के, आयसीआयसीआय बँक ५.१३ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.१८ टक्के, एनटीपीसी २.११ टक्के, बजाज फायनान्स १.६१ टक्के, लार्सन १.२५ टक्के, ॲक्सिस बँक १.३१ टक्के वाढीसह बंद झाले. तर मारुती सुझुकी ४.११ टक्के, टाटा मोटर्स ४.०६ टक्के, सन फार्मा २.१४ टक्के, भारती एअरटेल १.६१ टक्के, इन्फोसिस १.२५ टक्के घसरून बंद झाले.

बँकिंग शेअर्समध्ये तेजीआजच्या व्यवहारात सर्वाधिक वाढ बँकिंग शेअर्समध्ये झाली. निफ्टी बँकेत समाविष्ट असलेल्या १२ शेअर्सपैकी ११ वाढीसह बंद झाले आणि इंडसइंड बँकेचा फक्त एक शेअर्स घसरला. निफ्टी बँक १०६१ अंकांनी वाढीसह बंद झाला. याशिवाय मेटल, रिअल इस्टेट, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स तेजीने बंद झाले. तर ऑटो आयटी, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी क्षेत्रातील समभाग घसरले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.९२ टक्क्यांच्या वाढीसह आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारएसबीआयआयसीआयसीआय बँकशेअर बाजार