Join us

डीएचएफएलने थकविले ५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:16 AM

कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.

नवी दिल्ली : मागील वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पाेरेशन (डीएचएफएल)कडून अपरिवर्तनीय रोख्यांची मुदत संपल्यावरही ५० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आलेले नाही.कंपनीने जारी केलेल्या ५० कोटी रुपयांच्या संरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (एनसीडी) मूळ रक्कम ३ जुलै, २०२० रोजी परत करावयाची होती. मात्र ती रक्कम परत देण्याची कंपनीची आर्थिक स्थिती नसल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.कंपनीने २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी संबंधित अधिकारिणीकडे अर्ज दाखल केला असून, त्याबाबतअद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र