Dhirubhai Ambani Death Anniversary: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी आहे. १९५८ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी ज्या व्यवसायाची स्थापना केली ती कंपनी आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. धीरूभाई अंबानींच्या जीवनाशी संबंधित एक अनोखा किस्सा आहे. त्यांना केवळ 'माती'ची विक्री मोठी रक्कम मिळवली. त्यांच्यातील याच कौशल्यामुळे कदाचित आज रिलायन्स या उंचीवर पोहोचली आहे.
धीरूभाई अंबानी यांनी भारतात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही दिवस येमेनमध्ये काम केलं. आखाती देशात घालवलेल्या काळात, जिथे त्यांनी व्यवसाय करण्याच्या अनेक युक्त्या शिकल्या. त्या ठिकाणी त्यांना व्यवसायाच्या अनेक संधीही मिळाल्या. 'माती विकून' पैसे कमावण्याची त्यांची कहाणीही आखाती देशाशी संबंधित आहे.
मातीच्या विक्रीतून कमाईएका अरब देशातील शेखला गुलाबाच्या फुलांची बाग तयार करायची होती. त्यासाठी त्यांना सुपीक मातीची गरज होती. धीरूभाई अंबानींना याची माहिती मिळताच त्यांनी आपले कॉन्टॅक्ट वापरून भारतातून ही माती त्या शेखला पाठवली. त्या बदल्यात त्यांना कमालीचा मोबदल मिळाला. या घटनेनंतर काही काळातच धीरूभाईंनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा ब्रँड 'विमल' उभा केला.
३ वेळा बदललं रिलायन्सचं नावजेव्हा धीरूभाई अंबानी यांनी १९५८ मध्ये व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांनी केवळ ५०० रुपयांची गुंतवणूक करुन आपलं काम सुरू केलं होतं. त्यांनी मुंबईत भाड्याचं ऑफिस घेतलं, ज्यात त्यावेळी फक्त एक टेबल आणि ३ खुर्च्या होत्या. त्यावेळी प्रामुख्यानं ते मसाल्याचं ट्रेडिंग करत होते आणि त्यांच्या कंपनीचं नाव रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन होतं.
त्यानंतर १९६६ मध्ये त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे कापड गिरणी सुरू केली. यासह रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन हे रिलायन्स टेक्सटाइल बनले. या घटनेच्या एका दशकानंतर १९७७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला त्याचं सध्याचं नाव मिळालं. तोपर्यंत धीरूभाई अंबानी पेट्रोकेमिकल्सच्या व्यवसायात उतरले होते.
१९७७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं देशातील पहिला आयपीओ लाँच केला. या घटनेनं देशातील शेअर बाजाराचा विस्तार झाला. यासह रिलायन्स इंडस्ट्रीजनं शिखर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला.