सुरत : कोरोनाच्या साथीमुळे गुजरातमधील सुरत येथील हिऱ्यांना पैलू पाडणारे कारखाने १३ जुलैपर्यंत बंद असतील, तर हिºयांचा व्यापार करणारी बाजारपेठ ९ जुलैपर्यंत खुली होणार नाही. सुरत महानगरपालिकेचे आयुक्त बंछानिधी पणी यांनी यासंदर्भात सोमवारी आदेश दिला.
कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेचे नियम आणि कामकाजासंबंधी मापदंडाचे पालन केल्यास हे कारखाने सुरू करण्यात परवानगी दिली जाईल, असे पणी यांनी म्हटले आहे. एक किंवा अधिक रुग्ण आढळल्यास वस्रोद्योग किंवा कापड बाजारपेठ सात दिवसांसाठी बंद ठेवली जाईल. सुरतमध्ये हिºयाला पैलू पाडण्याचे काम करणाºया ५७० हून अधिक कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.
हिऱ्यांना पैलू पाडणारे उद्योग १३ जुलैपर्यंत राहणार बंद
कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेचे नियम आणि कामकाजासंबंधी मापदंडाचे पालन केल्यास हे कारखाने सुरू करण्यात परवानगी दिली जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:44 AM2020-07-07T00:44:12+5:302020-07-07T00:44:38+5:30