Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेव्हा फक्त 12.50 रुपये होते खिशात, आता कार-फ्लॅट दिवाळी बोनस म्हणून देतात!

तेव्हा फक्त 12.50 रुपये होते खिशात, आता कार-फ्लॅट दिवाळी बोनस म्हणून देतात!

ना शिक्षण होतं, ना कुणी गॉडफादर. पण, हिऱ्याला पैलू पाडता-पाडता ते स्वतःच कधी हिरा होऊन गेले, हे सवजी ढोलकिया यांना कळलंच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:32 PM2018-10-27T12:32:56+5:302018-10-27T12:42:37+5:30

ना शिक्षण होतं, ना कुणी गॉडफादर. पण, हिऱ्याला पैलू पाडता-पाडता ते स्वतःच कधी हिरा होऊन गेले, हे सवजी ढोलकिया यांना कळलंच नाही.

diamond merchant savji dholakia journey from 12 rupees to 6000 crore turnover | तेव्हा फक्त 12.50 रुपये होते खिशात, आता कार-फ्लॅट दिवाळी बोनस म्हणून देतात!

तेव्हा फक्त 12.50 रुपये होते खिशात, आता कार-फ्लॅट दिवाळी बोनस म्हणून देतात!

अहमदाबादः गेल्या काही वर्षांपासून दिवाळी आली की एक नाव हमखास चर्चेत येतं. ते म्हणजे, सवजी भाई ढोलकिया. सूरतमधील बडे हिरेव्यापारी. त्यांचा टर्नओव्हर जेवढा मोठा आहे, तेवढंच त्यांचं मनही विशाल आहे. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क फ्लॅट किंवा नवीकोरी कार देणाऱ्या या बॉसचं सगळ्यांनाच अप्रूप वाटतं. पण, एकेकाळी हा माणूस फक्त 12.50 रुपये घेऊन नशीब अजमावायला निघाला होता. ना शिक्षण होतं, ना कुणी गॉडफादर. पण, हिऱ्याला पैलू पाडता-पाडता ते स्वतःच कधी हिरा होऊन गेले, हे त्यांनाही कळलं नाही. त्यांची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. 

सवजी ढोलकिया यांच्या कंपनीचं नाव आहे, 'हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट कंपनी'. या कंपनीत सुमारे 8 हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्यातील 600 जणांना यावर्षी बोनस म्हणून चकाचक-टकाटक कार मिळणार आहे. 

12 एप्रिल 1962 रोजी गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावात सवजी ढोलकिया यांचा जन्म झाला. 13व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर, 1977 साली ते सूरतमध्ये आले. तेव्हा, त्यांच्या खिशात घरभाड्यासाठी आणलेले 12.50 रुपये होते. आपल्या काकांसोबत त्यांनी हिऱ्यांच्या व्यवसायात काम सुरू केलं. या काळात व्यवसायातील बारकावे त्यांना शिकता आले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर, 1991 मध्ये त्यांनी हरी कृष्ण एक्सपोर्ट्स कंपनी सुरू केली. 

2014 मध्ये सवजी ढोलकिया यांच्या कंपनीची उलाढाल 400 कोटी रुपये होती. आज ती 6000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. अमेरिका, चीन, हाँगकाँगसह 50 देशांमध्ये हरी कृष्ण एक्सपोर्ट्सचे दागिने निर्यात केले जातात. 

सवजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दणदणीत भेटी दिल्याची बातमी 2011 मध्ये पहिल्यांदा आली होती. त्यानंतर, 2014 मध्ये त्यांनी दिवाळी बोनसवर 50 कोटी रुपये खर्च केले होते. 2015 मध्ये त्यांनी आपल्या 491 कर्मचाऱ्यांना कार आणि 200 जणांना फ्लॅटची चावीच भेट दिली होती. त्यामुळे 'बॉस असावा तर असा', अशी चर्चा तेव्हाही झाली होती आणि आजही होते. आपल्या कंपनीत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तिघा जणांना ढोलकिया यांनी GLS 350d मर्सिडीज कार भेट दिली होती. या कारची किंमत एक कोटी रुपयाहून अधिक आहे. 

गेल्या वर्षीच्या दिवाळीत Datsun redi-GO भेट देऊन त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं कारचं स्वप्न साकार केलं होतं. यंदा मारुती सुझुकीच्या करकरीत कार कर्मचाऱ्यांसाठी सज्ज आहेत.  

Web Title: diamond merchant savji dholakia journey from 12 rupees to 6000 crore turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.