Join us

'UPI'वरुन चुकीच्या खात्यावर तुमचे पैसे गेले, परत मिळत नाहीत? 'या' ट्रिक्स फॉलो करा, तुमची रक्कम लगेच मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 5:18 PM

आपल्याकडे डिजीटल व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना कधी कधी आपल्याकडून ही रक्कम दुसऱ्याच नंबरवर गेली जाते.

गेल्या काही वर्षापासून देशात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. भाजीपासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडेच ऑनलाईन व्यवहार केले जात आहेत. पण, ऑनलाईन व्यवहार करत असताना चुकीच्या नंबरवर पैसे जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. जर चुकीच्या नंबरवरती पैसे गेले तर ते परत घेणे कठीण होते, अनेकांच्या याबाबतीत तक्रारी असतात. पण, काही ट्रिक जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. 

UPI पेमेंटशी संबंधित समस्यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही चुकीचे पेमेंट केले असेल, तर तुम्हाला तक्रारीच्या २४ ते ४८ तासांच्या आत पैसे परत मिळतात. पाठवणारा आणि घेणारा एकाच बँकेचे असल्यास, पैसे लवकर मिळू शकतात, पण जर बँका वेगळ्या असतील तर थोडा वेळ लागू शकतो.

काय आहे पोस्ट ऑफिसची 'नॅशनल पेन्शन योजना'; कमी दिवसात गुंतवणूक करुन करोडपती होऊ शकता

पैसे लगेच परत मिळवण्यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्सचा वापर केला तर आपल्याला पैसे लगेच मिळू शकतात. समजा तुमचे पैसे चुकीच्या नंबरवरती गेले तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला तुमचे पेमेंट चुकून पाठवले आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचा स्क्रीनशॉट शेअर करून पैसे परत पाठवण्याची विनंती करा.

टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवा

जर एखाद्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर ताबडतोब टोल फ्री क्रमांक १८००-१२०-१७४० वर तक्रार नोंदवा.

अॅपच्या कस्टमर केअरवर तक्रार नोंदवा

चुकीचे UPI पेमेंट झाल्यास, तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही ॲपच्या  कस्टमर केअरशी बोला आणि तुमची तक्रार नोंदवा आणि व्यवहार तपशील शेअर करा. तसेच  तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता, बँक तुमचे पैसे परत करण्यात मदत करू शकते.

NPCI कडे तक्रार करा

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) UPI व्यवहार व्यवस्थापित करते, तुम्ही तुमची तक्रार येथे नोंदवू शकता, ते तुमचे पैसे परत मिळवण्यात मदत करू शकते. या सोप्या टिप्स फॉलो करुन तुमचे पैसे परत मिळवू शकता.

टॅग्स :गुगल पेबँक