Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol-Diesel Prices Hike : तुर्तास दिलासा नाही! उद्याही वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या किती होणार वाढ

Petrol-Diesel Prices Hike : तुर्तास दिलासा नाही! उद्याही वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या किती होणार वाढ

गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 1.60 रुपयांनी वाढले आहेत. आता तिसऱ्यांदा 80 पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.40 रुपयांची वाढ होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:27 PM2022-03-24T22:27:03+5:302022-03-24T22:27:36+5:30

गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 1.60 रुपयांनी वाढले आहेत. आता तिसऱ्यांदा 80 पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.40 रुपयांची वाढ होईल.

Diesel and Petrol prices hiked again prices increased by RS 2 .40 per liter in last 3 days | Petrol-Diesel Prices Hike : तुर्तास दिलासा नाही! उद्याही वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या किती होणार वाढ

Petrol-Diesel Prices Hike : तुर्तास दिलासा नाही! उद्याही वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या किती होणार वाढ

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सलग दोन दिवस झालेल्या 80 पैशांच्या वाढीनंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून या नवीन किमती लागू होतील.

असा असेल उद्याचा दर -
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राजधानी दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलची किंमत 97.01 रुपये प्रति लीटर वरून 97.81 रुपये प्रति लीटर होईल. तर डिझेलची किंमत 88.27 रुपये प्रति लीटरवरून 89.07 रुपयांवर पोहोचेल.

4 दिवसांत एवढी वाढ - 
गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 1.60 रुपयांनी वाढले आहेत. आता तिसऱ्यांदा 80 पैशांच्या वाढीसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.40 रुपयांची वाढ होईल. खरे तर, आज म्हणजेच गुरुवारी दरवाढ झालेली नव्हती. यापूर्वी 22 मार्च आणि 23 मार्चला पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 80-80 पैशांची वाढ झाली होती.
 

Web Title: Diesel and Petrol prices hiked again prices increased by RS 2 .40 per liter in last 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.