Lokmat Money > बिझनेस न्यूज > घाऊक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार कसा परिणाम? जाणून घ्या 

घाऊक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार कसा परिणाम? जाणून घ्या 

Diesel Price Hike: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. दरम्यान, आता घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी महागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 03:48 PM2022-03-20T15:48:55+5:302022-03-20T15:49:26+5:30

Diesel Price Hike: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. दरम्यान, आता घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी महागले आहे.

Diesel goes up by Rs 25 for wholesale consumers, how will it affect your pocket? Find out | घाऊक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार कसा परिणाम? जाणून घ्या 

घाऊक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपयांनी महागले, तुमच्या खिशावर होणार कसा परिणाम? जाणून घ्या 

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. दरम्यान, आता घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी महागले आहे. घाऊक ग्राहकांना होणाऱ्या डिझेलच्य विक्रीमध्ये प्रतीलिटर तब्बल २५ रुपयांनी वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र पेट्रोल पंपावरून होणाऱ्या डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

या महिन्यामध्ये पेट्रोल पंपावरून होणाऱ्या विक्रीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बस ताफ्यांचे मालक आणि मॉलसारख्या घाऊक ग्राहकांनी पेट्रोल पंपावरून डिझेलची खरेदी केली. सर्वसाधारणपणे ते पेट्रोल कंपन्यांकडून थेटपणे इंधन खरेदी करतात. त्यामुळे तेलाची किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेलसारख्या कंपन्यांना बसला आहे. विक्री वाढली तरी या कंपन्यांता आतापर्यंत प्रमाण कमी केलेले नाही. मात्र आता पंपासाठी व्यवहार चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक ठरणार नाही.

दरम्यान, तीन सूत्रांनी सांगितले की, रेकॉर्ड १३६ दिवसांपासून तेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे कंपन्यांना या दरांनी अधिक तेल विकण्याऐवजी पेट्रोलपंप बंद करणे अधिक व्यावहारिक पर्याय असेल. २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने विक्री घटून शून्यावर आली तेव्हा आपले सर्व १४३२ पेट्रोल पंप बंद केले होते. सूत्रांनी सांगितले की, हीच स्थिती आता तयार होत आहे. घाऊन ग्राहक पेट्रोल पंपावरून खरेदी करत आहेत. त्यामुळे रिटेलर्सचा तोटा वाढत आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत वाढून १२२.०५ रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे. तर पेट्रोल पंपांवर पेट्रोलची विक्री ही ९४.१४ रुपये दराने होत आहे. दिल्लीच्या पेट्रोल पंपांवर डिजेल ८६.६७ रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. तर घाऊक ग्राहकांसाठी त्याचा दर हा ११५ रुपये प्रति लिटर एवढा आहे. 

Web Title: Diesel goes up by Rs 25 for wholesale consumers, how will it affect your pocket? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.