Join us

दिलासादायक; तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर; देशात सर्वात स्वस्त इंधन 79.74 रुपये लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 5:43 PM

मेघालय आणि महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह सर्वच राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 98व्या दिवशीही कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डीझेलचे नवे दर (Petrol diesel new rates) जारी केले आहेत. मेघालय आणि महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह सर्वच राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 98व्या दिवशीही कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये लीटर आहे तर डिझेल 79.74 रुपये लीटर आहे.

मेघालय सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स वाढवला आहे. यानंतर, मेघालयातील बिरनिहाटमध्ये पेट्रोलचा दर आता 95.1 रुपया प्रति लीटर, तर शिलाँगमध्ये 96.83 रुपये लीटर असेल. बिरनिहाटमध्ये डिझेलचा दर 83.5 रुपये प्रति लीटर आणि शिलाँगमध्ये 84.72 रुपये प्रति लीटर एवढा असेल. येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल -पोर्ट ब्लेअरमध्ये - 84.1 रुपया लिटर.   सर्वात स्वस्त डिझेल -पोर्ट ब्लेअरमध्ये - 79.74 रुपये लिटर.    सर्वात महागडे पेट्रोल -श्रीगंगानगरमध्ये - 113.49 रुपये लिटर.   सर्वात महागडे डिझेल -श्रीगंगानगरमध्ये - 98.24 रुपये लिटर.

शहराचे नाव - पेट्रोल रुपये/लीटर - डीजल रुपये/लीटरआग्रा  -  96.35  -  89.52लखनौ  -  96.57  -  89.76पोर्ट ब्लेअर  -  84.1  -  79.74देहरादून  -  95.26  -  90.28    चेन्नई  -  102.63  -  94.24बेंगळुरू  -  101.94  -  87.89कोलकाता  -  106.03  -  92.76दिल्ली  -  96.72  -  89.62अहमदाबाद  -  96.42  -  92. 17चंडीगड  -  96.2  -  84.26मुंबई  -  106.31  -  94.27भोपाळ  -  108.65  -  93.9धनबाद  -  99.99  -  94.78    फरीदाबाद  -  97.45  -  90.31    गंगटोक  -  102.50  -  89.70    गाझियाबाद  -  96.50  -  89.68    गोरखपूर  -  96.76  -  89.94  श्रीगंगानगर  -  113.49  -  98.24परभणी  -  109.37  -  95.77जयपुर  -  108.48  -  93.72रांची  -   99.84  -  94.65पाटणा  -  107.24  -  94.04

असा चेक करा आपल्या शहरातील दर -आपण रोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा दर एका SMS च्या माध्यमानेही चेक करू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक (IOC) RSP<डिलर कोड> लिहून 9224992249 क्रमांकावर. तसेच, एचपीसीएलचे (HPCL) ग्राहक HPPRICE <डिलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवू शकता. याच बरोब बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक RSP<डिलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवू शकता. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय