Join us

डिझेलचे दर उच्चांकी; प्रवास मालवाहतुकीत वाढ शक्य, अनेक राज्यांमध्ये पेट्रोलही उच्चांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 10:52 AM

४ मेपासून आतापर्यंत ३४ वेळा पेट्राेलची, तर ३३ वेळा डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. तेव्हापासून पेट्राेल ९.११ आणि डिझेल ८.६३ रुपये प्रतिलिटरने महागले आहे.

मुंबई : पेट्राेल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. पेट्राेलपाठाेपाठ काही राज्यांमध्ये डिझेलचेही दर शंभरी पार गेले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्राेलचे दर ३५ पैसे आणि डिझेलचे दर १८  पैशांनी वाढविले. त्यामुळे आता मध्य प्रदेशमध्ये डिझेलच्या दराने शतक गाठले आहे. याशिवाय सिक्कीममध्येही पेट्राेल शंभरी पार गेले आहे. (Diesel prices hick; Travel freight growth is possible, with petrol at higher levels in many states)देशाची राजधानी दिल्लीत पेट्राेलची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्राेल ९९.५१ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल दर ८९.३६ रुपये प्रतिलिटर एवढे झाले आहेत. मुंबईत पेट्राेलचे दर १०५.५८ रुपये, चेन्नईत १००.५३, काेलकाता येथे ९९.४५ रुपये आणि बंगळुरू येथे १०२.८४ रुपये प्रतिलिटर एवढे झाले. याशिवाय हैदराबाद, भुवनेश्वर, पाटणा आणि त्रिवेंद्रम या शहरांमध्येही पेट्राेलचे दर शंभरी पार गेले आहेत.  चिंताजनक बाब म्हणजे डिझेलच्या दरानीही काही राज्यांमध्ये शतक पूर्ण केले असून, काही राज्यांमध्ये शतकाकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत डिझेलचे दर ८९.३६ रुपये, तर मुंबईत ९६.९१ रुपये, काेलकाता येथे ९२.२७ आणि चेन्नई येथे ९३.९१ रुपये प्रतिलिटर एवढे झाले. 

कच्च्या तेलाचा दाेन वर्षांतील उच्चांक -४ मेपासून आतापर्यंत ३४ वेळा पेट्राेलची, तर ३३ वेळा डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. तेव्हापासून पेट्राेल ९.११ आणि डिझेल ८.६३ रुपये प्रतिलिटरने महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७५ डाॅलर्स प्रतिबॅरलच्या वर दाेन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय