Join us

वेगवेगळ्या चार्जरची आता कटकट संपणार; समान चार्जिंग पोर्ट देशात लागू करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:27 AM

भारत सरकारने मोबाइल आणि वियरेबल इलेक्ट्रिक उपकरणांसाठी २ समान चार्जिंग पोर्ट देशात लागू करण्याची तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत सरकारने मोबाइल आणि वियरेबल इलेक्ट्रिक उपकरणांसाठी २ समान चार्जिंग पोर्ट देशात लागू करण्याची तयारी केली आहे. यापैकी मोबाइल, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी यूएसबी टाइप-सी चार्जर असेल. दुसरा परिधानयोग्य (वियरेबल) इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन पोर्ट असेल. भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस)  टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि चार्जर बनविण्यासाठी ‘गुणवत्ता मानक’ (क्वालिटी स्टँडर्ड) जारी केले आहे.

ही योजना लागू झाल्यानंतर मोबाइल फोनसाठी वेगवेगळे चार्जर बाळगण्याची गरज राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्यावरही काही प्रमाणात नियंत्रण येईल. ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंह म्हणाले की, यूएसबी टाइप-सी चार्जर स्वीकारण्याची तयारी सर्व हितधारकांनी दर्शविली आहे. त्यानंतरच बीआयएसने गुणवत्ता मानक जारी केले आहेत. ‘आयआयटी-कानपूर’मध्ये घडाळ्यासाठी ‘परिधानयोग्य इलेक्ट्रॉनिक’ उपकरणांसाठी सिंगल चार्जिंग पोर्टचा अभ्यास केला जात आहे. 

टाइप-सी चार्जर वापरणारे ब्रँड सॅमसंग, शाओमी, ओप्पो, वीवो, रियलमी, मोटोरोला हे ब्रँड टाइप-सी चार्जिंग पोर्टचे फोन उत्पादित करतात. ॲपल पुढील वर्षापासून ‘टाइप-सी’कडे वळणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मोबाइल