मुंबई : केंद्र सरकार डिजिटायझेशनच्या प्रसारासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी विशेष ‘फिनटेक’ (वित्त तंत्रज्ञान) धोरण आणले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तंत्रज्ञानाचा ऊहापोह करण्यासाठी डिजिटल कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. डिजिटल लेंडर असोसिएशन आॅफ इंडियातर्फे (डीएलएआय) गुरुवार, ३ मे रोजी विशेष परिषद मुंबईत होत आहे.
फिनटेक क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण या परिषदेत होणार आहे. फिनटेकसारख्या नवोदित क्षेत्रातील उदयोन्मुख उद्योजक व तज्ज्ञ
यांत सहभागी होत आहेत. या क्षेत्रातील विचारवंत, बँकर्स, फिनटेक कंपन्या, भांडवलदार, सरकारी प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि स्टार्ट-अप यांना एकत्र आणण्यासाठी ही परिषद होत आहे. त्यामध्ये ब्लॉकचेन, यूपीआय २.० आणि ई-मॅन्डेटसारख्या विषयांवर मुख्य सत्रासह दोन कार्यशाळा
होत आहेत. स्टार्टअप क्षेत्रातील सर्वोत्तम संकल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडून ५ कंपन्यांना व्यावसायिक
निधी उभारण्याची संधी यात
मिळणार आहे.
डिजिटायझेशनच्या प्रसारासाठी डिजिटल कंपन्या करणार ‘फिनटेक’चा ऊहापोह
केंद्र सरकार डिजिटायझेशनच्या प्रसारासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी विशेष ‘फिनटेक’ (वित्त तंत्रज्ञान) धोरण आणले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:09 AM2018-05-02T02:09:43+5:302018-05-02T02:09:43+5:30